जगभरातील सर्वोत्तम चित्रपटसृष्टींपैकी एक म्हणून बॉलिवूडची गणना होते. अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी अनेकजण बॉलिवूडच्या दिशेने वाटचाल करत असतात. काही कलाकार असे असतात की, फार कमी वेळात सगळ्याचे मन जिंकून घेतात, तर काही कलाकार अखंड मेहनत करूनही मागे पडतात. बऱ्याचदा काही कलाकार या चंदेरी दुनियेतून अचानक गायब होतात. 90 च्या दशकातल्या काही अभिनेत्रींनी अशी उत्त्तम कामगिरी केली आहे की, आजही त्या या क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. पण आज आपण अंजला झवेरी हिच्याबद्दल बोलणार आहोत.
सुपरस्टार विनोद खन्ना यांनी आपल्या चित्रपटासाठी अंजलाला इंग्लंडमधून आणले होते. खरं तर नव्वदच्या दशकात विनोद खन्ना हे आपला मुलगा अक्षय खन्ना याला बॉलिवूडमध्ये लाँच करणार होते. त्यासाठी ते ‘हिमालय पुत्र’चे चित्रीकरण करत होते. या चित्रपटासाठी ते एका नवीन अभिनेत्रीच्या शोधात होते. बघता बघता त्यांच्या समोर एक नवीन चेहरा समोर आला. तो होता अंजला झवेरीचा, पण हा चित्रपट चालला नाही. याचा परिणाम म्हणजे आपण पाहू शकतो की, एक प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही अक्षय खन्ना बऱ्याचदा मुख्य भूमिकेत दिसला नाही. त्याला अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणूनच काम करावे लागले आहे.
अंजली झवेरीबद्दल सांगायचे तर, तिने सलमान खान आणि काजोल यांच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात अंजलाने काजोल यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. हिमालय पुत्र या चित्रपटात दिसलेला अंजलाचा चेहरा अचानक गायब झाला, पण तुम्हाला माहित आहे का आजकाल अंजला कुठे आहे आणि ती काय करतेय?
‘प्यार किया तो डरना क्या’ नंतर तिने बर्याच हिंदी चित्रपटांत काम केले होते, पण तिला चित्रपटात फारसे यश प्राप्त झाले नाही. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा तिचा एकमेव हिंदी चित्रपट होता, ज्यात तिला चांगलीच पसंती मिळाली होती. अंजलाने तिच्या कारकीर्दीत बरेच चित्रपट केले, पण तिला यशस्वी अभिनेत्रीचे स्थान मिळू शकले नाही.
वास्तविक जीवनात अंजलाने मॉडेल आणि अभिनेता तरुण अरोराशी लग्न केले आहे. आज अंजला तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. तरुण अरोरा ज्याने ‘जब वी मेट’ चित्रपटात करिनाच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. जेव्हा हिंदी चित्रपटांमध्ये अंजलाचे नशीब चमकत नव्हते, तेव्हा तिने दक्षिण चित्रपटांकडे झेप घेतली होती. दक्षिणेत तिने भरपूर नाव कमावले आहे. दक्षिणेत अंजलाने तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. यातील तिचे जवळपास सर्वच चित्रपट नावाजले गेले आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत सांगायचे झाले, तर आता ती क्वचितच चित्रपट करते, तरीही तिचे दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये खूप नाव आहे.
बॉलिवूडमध्ये जास्त चित्रपट न केल्यामुळे अंजला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली आणि त्यानंतर ती गायब झाली. तसे, इंडस्ट्रीमध्ये तारा शर्मा, किमी काटकर, फराह नाझ अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अचानक गायब झाल्या. यांपैकी बहुतेक अभिनेत्री चित्रपटांच्या अपयशामुळे गायब झाल्या आहेत.(bollywood anjala zaveri this is how she looks now and what she is doingpageid)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनोरंजविश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी जगातील सर्वात मोठा मातृत्वाचा आनंद टाळून दिले फक्त करिअरला प्राधान्य
‘देव डी’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, एक मुलगी असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याबद्दल घ्या जाणून