Wednesday, August 13, 2025
Home बॉलीवूड कुणाला पाहून अनुराग कश्यप यांनी डिलीट केले टिंडर ऍप; स्वत:च म्हणाले, ‘मला वाटले…’

कुणाला पाहून अनुराग कश्यप यांनी डिलीट केले टिंडर ऍप; स्वत:च म्हणाले, ‘मला वाटले…’

दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाच्या प्रमाेशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 3 फेब्रुवारी राेजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्रमाेशनदरम्यान अनुराग यांनी त्यांच्या डेटिंग अॅप टिंडरबद्दल सांगितले, ज्यामुळे अनुराग कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

तर झाले असे की, अनुराग कश्यप (anurag kashyap) यांना विचारण्यात आले की, ‘तो कधी टिंडर अॅपवर हाेता का?’ यावर दिग्दर्शकाने उत्तर दिले, “होय, मी स्वतःसाठी टिंडर डाउनलोड केले होते. अॅप डाउनलोड केल्यानंतर, मला त्यावर माझे जवळचे लोक दिसू लागले. सर्व प्रथम अॅपवर मी माझा मॅनेजर पाहिला. यानंतर मला गुनीत मोंगा दिसली. त्यानंतर मी टिंडर डिलीट केले. कारण, मला असे वाटले की, ताे आपल्या लाेकांनाच दाखवताे.”

अनुराग कश्यप यांनी दाेनदा घेतला घटस्फाेट
अनुराग कश्यप यांनी 1997 मध्ये आरती बजाजशी पहिले लग्न केले हाेते. 12 वर्षांच्या या नात्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. अनुरागला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे, जिचे नाव आलिया आहे. त्यानंतर 2011 मध्ये अनुराग यांनी कल्की कोचलिनशी लग्न केले. त्यांचे हे लग्न 4 वर्षे टिकले.

यापूर्वी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप यांनी पहिले लग्न मोडण्याचे कारण सांगितले होते. ते म्हणाले, “मला दीड वर्षांपासून दारूचे व्यसन होते. एके दिवशी मी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आणि खूप मद्यपान केले, त्यानंतर आरतीने मला घराबाहेर हाकलून दिले. त्यावेळी आमची मुलगी 4 वर्षांची होती. तो माझ्यासाठी खूप कठीण टप्पा होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’या चित्रपटात आलिया आणि करण मेहता मुख्य भूमिकेत आहेत.(bollywood anurag kashyap after watching gurmeet monga deleted tinder app said i felt like )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’

लग्नापूर्वी कियारा अन् सिद्धार्थचा डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘संगीत झाले…’

हे देखील वाचा