Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्याकडे ब्राची जोडी आहे, पत्ता सांगा…’, अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर युजरची विचित्र कमेंट, तिनेही ‘अशी’ केली बोलती बंद

‘माझ्याकडे ब्राची जोडी आहे, पत्ता सांगा…’, अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर युजरची विचित्र कमेंट, तिनेही ‘अशी’ केली बोलती बंद

मॉडेल, गायिका, अभिनेत्री आणि व्हीजे अनुषा दांडेकर ही काही दिवसांपासून करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. तिने ब्रेकअप होण्याचे कारण उघड करत, अभिनेत्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अनुषा, सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला. त्यानंतर ट्रोलर्सने तिच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. एका युजरने तर लिहिले की ‘मी तुम्हाला ब्रा पाठवेल.’ ही कमेंट पाहिल्यानंतर मात्र अनुषा दांडेकरनेही युजरला बोलती बंद केली आहे.

अनुषा दांडेकरने स्वत: चा एक फोटो शेअर करत लिहिले की, “तुम्हाला मला लॉक करायचे असेल, तर मला त्या गोष्टींसह रुममध्ये लॉक होऊ द्या, ज्या मला आवडतात.” या फोटोत अनुषा फक्त जॅकेटमध्ये दिसली आहे. तिची हीच स्टाईल काही युजर्सला खटकली आहे.

एका महिला युजरने फोटोवर कमेंट करत लिहिले, “माझ्याकडे काही अतिरिक्त ब्राची जोडी आहे, मला तुमचा पत्ता सांगा, मी ते तुमच्याकडे पाठवेल.” या कमेंटवर अनुषानेही अतिशय मजेदार उत्तर दिले. तिने लिहिले, “तुम्ही ते तुमच्याकडेच ठेवा, मी त्याच्याशिवाय आनंदी आहे. धन्यवाद.” त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले, “जगात आधीच इतकी गरमी वाढत आहे आणि एक तू आहेस.” दुसरा म्हणाला, “तुम्ही काही परिधान केले होते की, हा पूर्णपणे कॅन्डीड फोटो आहे?”

अनुषा आता अभिनेता आणि माजी बिग बॉस स्पर्धक जेसन शाहला डेट करीत आहे. अलीकडेच अनुषासोबतच्या नात्यास दुजोरा देत जेसन म्हणाला की, “मी आणि अनुषा गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहोत. पहिल्या भेटीत मला ती आवडले होती. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आम्ही अद्याप लग्नाबद्दल विचार केला नाही, परंतु आम्ही आहे त्या क्षणाचा आनंद घेत आहोत. अनुषासोबत मला आयुष्य सुंदर वाटते.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

-लाखात एक भेट! पती डॅनियलकडून लग्नाच्या १० व्या वाढदिवशी सनी लिओनीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-‘समाजाला तुमच्यासारख्या आईची गरज…’, अनन्या पांडेच्या बहिणीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा हॉट फोटो, आईच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष

हे देखील वाचा