केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी देशाचा बजट सादर केला. या बजटमध्ये काही वस्तू महाग झाल्या आहेत, तर काही वस्तू स्वस्तही झाल्या आहेत. या बजटमध्ये मध्यमवर्गीयांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. पीएम मोदी यांनी 2023च्या बजटचे जोरदार कौतुक केले आहेत. या बजटमध्ये मनोरंजन क्षेत्राबाबत काहीही बोले गेले नसले तरी, बजटपूर्वी चित्रपटसृष्टीलाही काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोरंजनाचा विचार कोणी करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अलीकडेच ‘एएनआई’ शी बोलताना सांगितले की, ‘आपला एंटरटेनमेंट इंडस्ट्री हा देशातील सर्वात मोठा करदाता आहे. चित्रपटसृष्टी दरवर्षी जास्तीत जास्त कर भरते, पण आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्कडे सर्वच सरकारांचे नेहमीच दुर्लक्ष झाले हे आपले दुर्दैव आहे. अर्थसंकल्पात ज्याप्रकारे इतर उद्योगांबद्दल बोलले गेले, त्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलले गेले नाही.’
Brilliant budget.
Congratulations @narendramodi and @nsitharamanoffc.
More power to Bharat.— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 1, 2023
अशोक पंडित पुढे म्हणाले की, ‘इतर उद्योग जसा नफ्याचा विचार करतात, तसा विचार आपल्या इंडस्ट्री कोणी करत नाही. चित्रपटसृष्टीला कसे वाचवायचे, पुढे कसे न्यायचे याचा विचार कोणी करत नाही. आपण या देशातील सर्वात मोठे करदाते आहोत. कोविड-19 महामारीच्या काळातही आम्ही घरात बसून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या चित्रपटसृष्टीमुळेच लोक डिप्रेशनमधून वाचले आहेत.’ असे मत अशाेक पंडित यांनी मांडले.
ट्विट करत विवेक अग्निहाेत्रीने केले अभिनंदन
ट्विट करताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, एक उत्तम बजेट. अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन. भारताला अधिक शक्तिशाली बनवले पाहिजे.(bollywood ashok pandit furious over the neglect entertainment industry in the budget)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
आईच्या निधनानंतर रडताना दिसली राखी सावंत; म्हणाली, ‘माझं लग्न धोक्यात…’
अमृता अरोरा चेहरा लपवत पार्टीतून पडली बाहेर; युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘तोंड लपवावे…’