अलीकडेच कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. डॉक्टरांचा या घटनेला तीव्र विरोध होत आहे. या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऋचा चढ्ढाने तिच्या अधिकृत X खात्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून निष्पक्ष तपासाची मागणी आहे. ऋचाने लिहिले, “या देशातील महिलांना तुमच्याकडून निष्पक्ष तपास आणि न्यायाची अपेक्षा आहे.
आलिया भट्टने पोस्ट केले की, “आणखी एक बलात्कार. महिला कुठेही सुरक्षित नाहीत याची जाणीव करून देण्याचा आणखी एक दिवस.” भारतात दहा वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून देताना ती म्हणाले, “निर्भया प्रकरणाला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, तरीही काहीही बदल झालेला नाही त्या प्रकरणाची आठवण करून देणारा हा आणखी एक भयानक प्रसंग आहे.”
अभिनेता विजय वर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून लिहिले की, “किमान आमच्या रक्षकांचे तरी रक्षण करा.” विजयने ‘डॉक्टर सध्या काय बोलतात याकडे आपण लक्ष का द्यावे’ याबाबतही पोस्ट केली आहे.
आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रामवर ‘काश मैं लड़का होता’ अशी कविता पोस्ट केली आहे. आयुष्मानने या व्हिडिओमध्ये महिलांच्या भावना आणि काळजीचे चित्रण केले आहे. महिला नेहमी तणावाखाली नसतील तर त्यांचे आयुष्य कसे असेल, निर्भयपणे दिवस घालवता आले तर काय होईल, रात्री शांतपणे झोपणे किती सोपे होईल, याविषयी ही कविता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
शाहरुखला आवडत नाहीत त्याचे रोमँटिक चित्रपट; टॉम क्रूझच्या चित्रपटांविषयी केले विशेष वक्तव्य…