Saturday, July 6, 2024

भारत- पाकिस्तान सामन्यासाठी ‘या’ कलाकारांनी लावली होती हजेरी; फोटो जोरदार व्हायरल

टी२० विश्वचषकातील सुपर १२ मधील ग्रूप २मधील सामना रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघात पार पडला. गेल्या १४ वर्षांपासून टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध एकही विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या सामन्यात पाकिस्तान संघाने विजयाची प्रतीक्षा संपवली आणि भारतीय संघावर १० गडी राखून जोरदार विजय मिळवला. या सामन्याला काही बॉलिवूड कलाकारांनीही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये हजेरी लावली होती. यादरम्यानचे अनेक फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. नेहमीच हा सामना पाहण्यासाठी सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत अनेकजण आपले हातातले काम सोडून टीव्हीपुढे बसतात. मात्र, यांपैकी काही उत्सुक प्रेक्षक थेट सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्येही हजेरी लावताना दिसतात. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचाही समावेश होता.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा सामना पाहताना दिसून आला. तसेच पंजाब किंग्स संघाची संघमालक प्रीती झिंटा देखील या सामन्याच्या आनंद घेताना दिसून आली होती, तर उर्वशी रौतेला देखील हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाचा उत्साह वाढवताना दिसून आली होती. यासह मौनी रॉय देखील स्टेडियममध्ये उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेताना दिसून आली. उर्वशी रौतेलाने तर तिच्यासाठी बऱ्याच दिवसांपूर्वी तिकीट बुक केले होते.

अभिनेत्री प्रीति झिंटाने अधिकृत ट्विटरवरून एक पोस्टही शेअर केली आहे. त्यामध्ये ती आपल्या पतीसोबत दिसत आहे.

‘सूर्यवंशी’ हा सिनेमा रोहित शेट्टीच्या सिंघम सीरिजमधील सिनेमा असून, हा चित्रपट मागच्यावर्षी २०२० मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने हा सिनेमा यावर्षीची दिवाळी अधिक आनंददायी करण्यासाठी येत्या ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा