Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘असत्यावर सत्याचा विजय’, म्हणत बॉलीवूड कलाकारांनी दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा

सत्याचा असत्यावर होणार विजय साजरा करण्यासाठी आपल्या देशात दसरा सण साजरा केला जातो. संपूर्ण देशामध्ये दसरा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होत आहे. प्रभू श्री राम यांनी रावणाचा वध आजच्याच दिवशी केला असल्याने आज अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळत विजयादशमी साजरी करतात. अशात बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांनी जल्लोषात विजयादशमी साजरी करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लता मंगेशकर

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ट्विट करत लिहिले की, “नमस्कार. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा.”

 

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चनने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “प्रेम, शांती आणि सुखासह तुमच्या आयुष्यात नेहमी सत्याचा विजय होवो. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.”

हेमा मालिनी

दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना ट्विट करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “विजयादशमी वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय असलेले एक पर्व आहे. सकारात्मक ऊर्जा कायमच नकारात्मकतेला दूर करेल, ज्यामुळे सर्वत्र शांती आणि समृद्धी पसरलेली दिसेल.”

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले, “कितीही वेळ लागला, काहीही आणि कसेही झाले तरी शेवटी विजय सत्याचाच होतो.” असे लिहित तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

सोनल चौहान

सोनल चौहानने देखील ट्विट करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने यावेळी पिवळ्या रंगाची एक साडी परिधान केली आहे. तिचे काही फोटो तिने शेअर करत लिहिले आहे की, “असत्यावर सत्याचा विजय.”

विंदु दारा सिंग

‘जय वीर हनुमान’ मालिकेमध्ये ‘हनुमान’ पात्र साकारलेला अभिनेता विंदु दारा सिंगने देखील चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “चला अस्त्यावर सत्याचा झालेला विजयाचा जल्लोषात साजरा करू. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.”

विनीत कुमार सिंग

विनीतने दसऱ्याच्या शुभेच्छा देत लिहिले आहे की, “असत्य कितीही बलवान असेल, तरी विजय मात्र सत्याचाच होतो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करो.”

इमरान हाश्मी

अभिनेता इमरान हाश्मीने देखील सर्वांना ट्वीटरवर एक फोटो शेअर करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनूप सोनी

अनूप सोनीने आजवर ‘क्राईम पेट्रोल’ मार्फत अनेकांना सत्याचा विजय दाखवून दिला आहे. त्याने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, “समोर असलेल्या रावणाला जो आग लावेल तोच खरा दसरा साजरा करू शकेल.”

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा