Wednesday, July 3, 2024

आत्मनिर्भरतेचा धडा शिकवणाऱ्या नरेंद्र मोदींना बॉलिवूडकरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

नरेंद्र मोदी भारतीय राजकारणाचा एक मोठा आणि महत्त्वाचाच चेहरा म्हणून मागील काही वर्षांपासून समोर आले. २०१४ साली मोदी लाट आली आणि संपूर्ण देश या लाटेत न्हाऊन निघाला. जगासमोर भारताचे रुपडे पालटणारा हा अवलिया हरप्रकारे देश देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आज शुक्रवारी (१७ सप्टेंबर) नरेंद्र मोदी त्यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या अवाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण जगातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यात बॉलिवूडमधील कलाकार देखील मागे नाही. सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांनी नरेंद्र मोदींसोबतचे फोटो, आठवणी शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुपम खेर :
अभिनेते अनुपम खेर अनेकदा पंतप्रधानांना पाठिंबा देताना दिसतात. पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोदी जी! तुम्हाला निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो. जेणेकरून तुम्ही प्रत्येक क्षेत्रात देशाला अभिमानास्पद बनवू शकाल. आमचे नशिबच आहे, तुमच्यासारखा नेता आम्हाला लाभला आहे. राष्ट्रासाठी तुमच्या निःस्वार्थ सेवेबद्दल धन्यवाद. जय हो आणि जय हिंद!”

अक्षय कुमार :
अभिनेता अक्षय कुमारने पोस्ट शेअर करताना लिहिले की,“तुम्ही नेहमीच मला खूप प्रोत्साहित करता आणि आशीर्वादही देता. मी तुमच्या सारखे लिहू शकत नाही. मात्र, आज तुमचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ! मोदीजी तुम्हाला निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो. अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.”

हेमा मालिनी :
पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लिहिले की, “सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस आहे, ज्यावेळी साथीचा रोग सर्वत्र पसरत होता, त्या कठीण काळात देशाचे नेतृत्व केले. देव त्यांना राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि आपले निःस्वार्थ कार्य करण्यासाठी शक्ती देवो”

रणदीप हुड्डा :
अभिनेता रणदीप हुड्डाने पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर करून त्यांना ७१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की,“प्रिय, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. तुम्हाला ७१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा!”

विवेक ओबेरॉय :
अभिनेते विवेक ओबेरॉयने पीएम मोदींचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारताची संस्कृती आणि भारताच्या तंत्रज्ञानाच्या संगमाने भारताला जागतिक गुरु बनवणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि तुम्हाला नेहमी निरोगी ठेवो. जय हिंद!”

कंगना रणौत :
बाॅलिवूडची पंगा क्विन आणि अभिनेत्री कंगना रणौतनेही पीएम मोदींना तिच्या इंस्टाग्रामवरील स्टोरीमधून शुभेच्छा देत अभिनंदन केले. तिने स्टोरी शेअर करताना लिहिले की,“जगातील महान नेते नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

किरण खेर
पीएम मोदींसोबत एक फोटो शेअर करताना अभिनेत्री किरण खेर यांनी लिहिले की, “आमची शान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्याला लढा देण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ति देवो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे.”‌ किरणयांच्या विषयी बोलायच झाले, तर किरण या एक भारतीय अभिनेत्री आहेत. तसेच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला आहे. सध्या त्या चंदीगड संसदीय मतदारसंघातून खासदार आहेत.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा