Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड कसला तो नाद! सलमानचा टॉवेल ते करिनाचा लेहंगा, आवडत्या कलाकाराच्या वस्तू घेण्यासाठी चाहत्यांनी ओतला पैसा

कसला तो नाद! सलमानचा टॉवेल ते करिनाचा लेहंगा, आवडत्या कलाकाराच्या वस्तू घेण्यासाठी चाहत्यांनी ओतला पैसा

बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या चाहत्यांना एका कारणाने आश्चर्यचकित करण्याची संधी सोडत नाहीत, मग ते त्यांच्या चित्रपटांद्वारे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असो. त्याच वेळी, चाहत्यांना देखील स्टार्सच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींमध्ये खूप रस असतो. चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराने वापरलेल्या गोष्टी विकत घेण्याचा नेहमीच छंद जडलेला असतो, ज्यासाठी ते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. जाणून घेऊया सेलिब्रिटींच्या अशाच महागड्या विकल्या गेलेल्या गोष्टींबद्दल. 

शम्मी कपूर-  शम्मी कपूर नेहमीच आपल्या खास स्टाइलसाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जायचे. ते त्यांच्या काळातील महान आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. जंगली चित्रपटातील गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांनी परिधान केलेले ब्राऊन जॅकेट लिलावात 88 हजार रुपयांना विकले गेले. शम्मी कपूर आणि आमिर खानच्या सर्वात मोठ्या चाहत्याने ते विकत घेतले आहे.

संजय लीला भन्साळी- संजय लीला भन्साळी यांचा देवदास हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट होता. माधुरी दीक्षितने या चित्रपटातील मार डाला या गाण्यात 30 किलो वजनाचा हेवी हिरवा लेहेंगा परिधान केला होता. माधुरीच्या या लेहेंग्यात मोत्यांचे काम होते. लिलावात हा लेहेंगा 3 कोटी रुपयांना विकला गेला.

सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातील जीने के है चार दिन या गाण्यात खूप अनोखी स्टेप्स केली होती. या गाण्याच्या एका सीनमध्ये सलमानने टॉवेल घेऊन डान्सही केला आहे. त्याची ही स्टेप आजही लोकांना खूप आवडते. सलमानचा हा टॉवेल लिलावात एक लाख ४२ हजार रुपयांना विकला गेला. मात्र, नंतर ही रक्कम एनजीओला देण्यात आली.

अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर या दोघांनीही बॉम्बे वेलवेटमध्ये अतिशय अनोखे कपडे घातले होते. नेपाळमधील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी पैसे उभे करण्यासाठी त्यांचे पोशाख लिलावासाठी ठेवण्यात आले होते.

करीना कपूरच्या हिरोईन या चित्रपटातील हलकट जवानी या गाण्यात अभिनेत्रीने अप्रतिम स्टेप्स केल्या आहेत. या गाण्यात तिने घातलेली साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली होती, नंतर या साडीचा लाखोंमध्ये लिलाव झाला आणि ती चॅरिटीसाठी दान करण्यात आली.

हेही वाचा-

बिग ब्रेकिंग l प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाटचे दुखःद निधन

राजकारणातुन थेट छोट्या पडद्यावर एंट्री! पंकजा मुंडें झळकणार नव्या भूमिकेत
वयाच्या १२ व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते २२ वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे दिलीप कुमारांसोबत त्यांची ‘लव्हस्टोरी’

हे देखील वाचा