आजकाल सौंदर्याचा अर्थ खूप बदलला आहे. सुंदर दिसण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार असतात. स्वतःला सुंदर दिसण्यासाठी लोक मेकअपचा वापर करतात. मेकअप ही एक अशी गोष्ट आहे, जी केवळ सामान्य महिलांच्याच नव्हे, तर बॉलीवूडच्या सौंदर्यवतींच्या आयुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. कोणत्याही अभिनेत्री किंवा अभिनेत्याला सुंदर बनवण्यात मेकअप आर्टिस्टचा मोठा वाटा असतो, पण मंडळी तुम्हाला माहित आहे का या मेकअप आर्टिस्टची फी किती असते. चला तर मग जाणून घेऊया कोणते मेकअप आर्टिस्ट किती फी घेतात.
मल्लिका भट
फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट मल्लिका भट अनेक लोकप्रिय अभिनेत्रींच मेकअप करते. या अभिनेत्रींमध्ये करीना कपूर, बिपाशा बसू, मीरा खान, शिल्पा शेट्टी आदींचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या मेकअप लूकची बरीच चर्चा आहे. इतकेच नाही, तर कपूर कुटुंब अनेकदा मल्लिकाला मेकअपसाठी ठेवते. मल्लिका एका सिटिंगसाठी 30 हजार रुपये घेते.
नम्रता सोनी
इंडस्ट्रीतील टॉप मेकअप आर्टिस्टच्या यादीत नम्रता सोनीचेही नाव आहे. नम्रता बॉलिवूड कलाकारांचे मेकअप करण्यासाठी ओळखली जाते. ती बॉलीवूडमधील सलमान खान आणि शाहरुख खान या प्रसिद्ध कलाकरांसाठी मेकअप करते. एवढेच नाही, तर नम्रता चित्रपट आणि जाहिरातींमध्ये मेकअपही करते. एका सिटिंगसाठी ती 40 हजार रुपये घेते.
अनु कौशिक
अनु कौशिक हे मेकअपच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक, ऐश्वर्या राय बच्चन यांचा मेकअप करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. एवढेच नाही, तर ‘हिचकी’ या चित्रपटात त्याने राणी मुखर्जीचा मेकअपही केला होता. या चित्रपटातील राणीच्या लूकचे खूप कौतुक झाले होते. अनु काैशिक एका सिटिंगसाठी 50हजार रुपये घेताे.
क्लिंट फर्नांडिस
क्लिंट फर्नांडिस हे देखील मेकअप इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. क्लिंटला बॉलिवूडची क्वीन कंगनाची मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखले जाते. कंगनाचा मेकअप लोकांना खूप आवडतो. क्लिंटने कॅटरिना कैफ आणि मानुषी छिल्लरसोबतही काम केले आहे. क्लिंट एका सिटिंगसाठी 75 हजार ते दिड लाख रुपये आकारतात.(bollywood celebs makeup artist charge heavy amount fees mallika bhat anu kaushik namrata soni)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझी आई मारत होती, बाबा ओरडत होते…’, वर्ल्डकपमध्ये कपडे काढल्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेने उघडले गुपित
अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण