Thursday, November 21, 2024
Home मराठी ‘चौथ्या कसोटी सामन्यावर एक चित्रपट यायला हवा’, ‘या’ अभिनेत्याने केली मागणी

‘चौथ्या कसोटी सामन्यावर एक चित्रपट यायला हवा’, ‘या’ अभिनेत्याने केली मागणी

मंगळवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन कसोटी सामना ३ गडी राखून जिंकला आणि क्रिकेट विश्वात एक नवा इतिहास रचला. कुणालाच भारत जिंकेल अशी कल्पनादेखील नव्हती कारण एका दिवसात ३२८ धावांचं लक्ष्य भारतीय संघाला गाठायचं होतं आणि तेही कोणत्या मैदानावर तर ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर! जिथे गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियन संघ एकही कसोटी सामना हरला नव्हता. सर्वांना वाटत होतं की भारत आज सामना ड्रॉ करेल आणि बॉर्डर-गावस्कर चषक घेऊन येईल परंतु भारतीय संघाने फक्त सामनाच नाही तर ही चार कसोटी सामन्यांची मालिका सलग तिसऱ्यांदा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा जिंकली.

भारतात तर सगळीकडे या मालिका विजयामुळे एकच जल्लोष उडाला आहे. सगळीकडे आनंदी आनंद साजरा केला गेला. या आनंदाचं कारणही तितकच खास आहे कारण पहिल्या कसोटी सामन्यानंतर करर्णधार कोहली भारतात परतला होता. त्यानंतर एकामागोमाग भारताचे ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि असं असतानाही नवख्या खेळाडूंना घेऊन भारत ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

या ऐतिहासिक विजयावर भारतीय पंतप्रधान, तसेच क्रीडा विश्वातल्या अनेक मान्यवरांकडून भारतीय संघावर सोशल मिडियामार्फत कौतुकाचा वर्षाव होतोय. अशात मनोरंजन विश्वातून जर काही प्रतिक्रिया आल्या नसत्या तरच नवलच! बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी या ऐतिहासिक विजयावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चला मग पाहुयात कोण कोण काय म्हणालं आहे ते…

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ट्विटरवर चक दे इंडिया म्हणत प्रतिक्रिया दिली.-

मराठमोळ्या रितेश देशमुखने देखील भारतीय संघाच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.-

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंहने देखील त्याच्या खास शैलीत या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.-

सुप्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन यानेही इंस्टा पोस्ट अपलोड करून भारतीय संघात या मालिका विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.-

बॉलिवूडमध्ये चतुरस्त्र अभिनयाचं दुसरं नाव असलेल्या बोमन इराणी यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.-

मिर्झापुर बॉय विक्रांत मेस्सी याने देखील भारतीय संघाचं या ऐतिहासिक विजयासाठी अभिनंदन केलं आहे.-

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाचं क्रिकेट प्रेम कुणापासून लपून राहिलेलं नाही. तर ती आजच्या विजयावर प्रतिक्रिया देणार नाही असं अजिबात होणार नाही.-

बॉलिवूडचा झकास अभिनेता अनिल कपूर देखील भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात कुठेही मागे पडलेला नाही.-

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे किती मोठे क्रिकेट प्रेमी आहेत हे वेगळं सांगायला नको. त्यांनी देखील खास शैलीत भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.-

तर या होत्या भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयावर मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रतिक्रिया!

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा