Monday, July 1, 2024

हम से ना टकराना! मृत्यूवर विजय मिळवणारे बॉलिवूड सुपरस्टार, बिग बींपासून ते सैफ अली खानपर्यंत ‘या’ कलाकारांचा समावेश

बॉलिवूडमध्ये असे अनेक मोठे कलाकार आहेत, ज्यांना अनेकदा गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्यांनी धैर्याच्या बळावर अगदी मृत्यूवरही त्यावेळी विजय मिळवला आहे. आज आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गंभीर रोगांचा एकेवेळी सामना केला होता.

अमिताभ बच्चन
बॉलिवूडचा एक असा अभिनेता, ज्याने आपल्या आवाजाने साऱ्यांनाच चक्रावून टाकले. आपल्या आवाजाबरोबरच आपल्या उत्त्तम अभिनयाने बॉलिवूडची दिशाच बदलून टाकली, असे हे सुप्रसिध्द अभिनेते म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन. कुली चित्रपटाच्या दरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांनी औषधांचा मोठा डोस घेतला होता. अपघाताच्या काही काळानंतरच त्यांना मायस्थेनिया ग्रॅविस नावाचा आजार झाला होता. एवढेच नव्हे तर, अमिताभ बच्चन एका वेळी टीबीसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. अमिताभ यांच्या पाठीत खूप वेदना होत असे, परंतु त्यांनी त्या आजाराकडे कधीच लक्ष दिले नाही. पण जेव्हा ते उपचार घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना कळले की, पाठीच्या कण्यामध्ये त्यांना टीबी आहे. २००६ मध्ये त्याच वेळी त्यांना कळले की, त्यांना हेपेटायटीस बी हा आजार आहे. मात्र, उपचारानंतर त्यांचा आजार बरा झाला होता.

सलमान खान
‘दबंग’ या चित्रपटातील अभिनेता सलमान खान २००१ पासून, ट्रायजेमिनल न्यूराल्जियाने ग्रस्त होता. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जरी तो आता या आजारापासून मुक्त झाला असला, तरीही सलमान खान अजूनही फार रागावू शकत नाही, कारण त्याच्या नसांना त्रास होतो. या आजाराबद्दल बोलताना सलमान म्हणाला की, बोलताना मला बर्‍याचदा तीव्र वेदना होतात. या वेदना काही सेकंद किंवा मिनिटांकरिता उद्भवते जी असह्य असते. मात्र, सलमानने अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर, त्याची प्रकृती आता चांगली आहे.

सोनाली बेंद्रे
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने एक पोस्ट लिहित सांगितले होते की, ती कर्करोगाने ग्रस्त आहे, आणि अमेरिकेत तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान सोनालीला खूप संघर्ष करावा लागला, परंतु तिने हार कधीच मानली नाही, आणि रोगाचा पराभव करत ती लवकरच भारतात परतली.

सैफ अली खान
सैफ अली खानला २००७ मध्ये, वेदना आणि अस्वस्थतेमुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे डॉक्टरांनी हलक्या हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली होती. डॉक्टरांनी सांगितले की, धूम्रपान व्यसनामुळे त्याला हा त्रास झाला आहे.

अनुराग बासू
सन २००४मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासू यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांनी अनुराग यांना तर फक्त दोन महिन्यांचाच वेळ सांगितला होता. असे असूनही, त्यांनी केवळ आपल्या या आजाराचा पराभव केला नाही, तर त्याच वेळी रुग्णालयातून आपला ‘तुम सा नहीं देखा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.

पूर्ण ३ वर्षाच्या केमोथेरपीनंतर ते बॉलिवूडमध्ये परतले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

-जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘८ दिवसात लग्न केले नाही तर…’

-जर कॉमेडीचा शहेनशाह सतिश कौशिकचा अस्सल अभिनय पाहायचा असेल तर हे पाच सिनेमे नक्की पाहा

हे देखील वाचा