बॉलिवूडमध्ये ‘चक द गर्ल’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणारी अभिनेत्री विद्या मालवडे. चित्रपट सृष्टीत येण्याआधी विद्या एक एअर होस्टेस होती. आज ती तिचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 मार्च 1973 मध्ये मुंबई इथे तिचा जन्म झाला. तिने तिच्या चित्रपट क्षेत्रातील करीअरची सुरूवात ‘विक्रम भट्ट’ यांच्या ‘इंतेहा’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात तिच्या सोबत मुक कलाकाराच्या भूमिकेत अश्मित पटेल हा होता.
2007 मध्ये आलेल्या तिच्या चक दे इंडिया या चित्रपटाने तिला चित्रपट सृष्टीत चांगलेच नाव दिले. विद्याने चक दे इंडिया नंतर ‘किडनॅप’ या चित्रपटात मनीषा लांबा याच्या आईची भूमिका निभावली होती. त्यानंतर ती “1920: द इव्हील रिटर्न्स” या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. विद्याने अनेक चित्रपटात सहायक अभिनेत्री पात्र निभावलं. तसेच ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली होती.
चित्रपट व्यतिरीक्त विद्याने टीव्ही सीरिअल्समध्ये देखील काम केले. तिने फॅमिली नंबर वन, फेअर फॅक्टर, सब को डर लगता है या सीरिअल्स मध्ये काम केले आहे.
तिने 2002 मध्ये ‘अरविंद सिंग बग्गा’ याच्यासोबत लग्न केले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तिने संजय दायमा यांच्याशी दुसरे लग्न केले. संजय दायमा यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर लगानमध्ये काम केले होते.
विद्या ही जी 5 च्या वेब सीरिज कालीच्या सेकंड सिझनमध्ये होती. यामध्ये तिने एका पोलिस ऑफिसरची भूमिका निभावली होती. यासोबतच विद्याने अनेक शॉर्ट फिल्म देखील केले आहेत.