Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड रिया चक्रवर्तीमुळे ‘चेहरे’ अडचणीत; मात्र निर्मात्यांचा अभिनेत्रीला पूर्ण पाठिंबा!

रिया चक्रवर्तीमुळे ‘चेहरे’ अडचणीत; मात्र निर्मात्यांचा अभिनेत्रीला पूर्ण पाठिंबा!

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या तिच्या ‘चेहरे’ या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती काम करत आहे की नाही, ही बाब बराच काळ गुलदस्त्यात होती. तथापि, 18 मार्च रोजी ‘चेहरे’चा ट्रेलर रिलीज झाल्यामुळे यावरून पडदा उठला. कारण ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्तीही दिसली. मात्र, ट्रेलर रिलीज होताच हा आगामी चित्रपट अडचणीत सापडला आहे. याचे कारण असे की, सोशल मीडियावर चित्रपटाचा बहिष्कार केला जात आहे.

सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी गेल्या वर्षी रिया चक्रवर्तीविरूद्ध एफआयआर दाखल केली होती. या एफआयआरमध्ये, त्यांनी अभिनेत्रीवर त्यांच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला होता. अशा परिस्थितीत, ‘चेहरे’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार घालण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच #बॉयकॉटचेहरे (#boycottchehre) हा हॅशटॅग सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे.

https://youtu.be/NGlcDRVDUs8

आता ‘चेहरे’ चित्रपटाच्या बहिष्कारावर निर्माता आनंद पंडित यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आनंद पंडित यांनी नुकतेच कोइमोई या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. यादरम्यान त्यांनी ‘चेहरे’ वर बहिष्कार टाकण्याबद्दल सांगितले की, असे काहीही झाले नाही. आनंद पंडित यांना ‘चेहरे’ वर बहिष्कार घालण्याची भीती आहे का, असे विचारले गेले. या प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले, “अजिबात नाही, कोणताही बहिष्कार नाही. काहीच नाही! आपण आमच्या यूट्यूब चॅनेलला देखील भेट देऊ शकता. आम्ही नुकताच याचा ट्रेलर रिलीज केला आहे. काही नकारात्मक कमेंट्स येत आहेत हे खरं आहे. मात्र, हे प्रत्येकसोबतच होत असतं.”

असे म्हटले जात होते की, रिया चक्रवर्तीची जागा अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने घेतली आहे, या अफवांवरही आनंद पंडित यांनी पूर्णविराम लावला आहे. आनंद पंडित म्हणाले, “तिने कोणाचीही जागा घेतलेली नाही. खरं तर यापूर्वी आमच्याकडे कृती खरबंदा होती, परंतु दुसर्‍या चित्रपटामुळे तिला तारीख देता आली नाही. म्हणून आम्हाला तिच्या जागी क्रिस्टलला घ्यावे लागले. मात्र, चित्रपटात रियाचे पात्र अगदी सुरुवातीपासूनच होते.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आनंद पंडित यांनी रिया चक्रवर्तीला पूर्ण समर्थन देत असल्याचे विधान केले. स्पॉटबॉयशी बोलताना आनंद म्हणाले, “रिया पूर्णपणे चित्रपटाचा एक भाग आहे आणि मी तिचे समर्थन करतो.” आनंद व्यतिरिक्त या चित्रपटाची दिग्दर्शिका रूमी जाफरी म्हणाली, “रिया नेहमीच चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे, तिला कसे वगळता येईल?” मात्र, या चित्रपटात रियाची फारशी भूमिका नाही. या चित्रपटात, रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त क्रिस्टल डिसूझा, अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

-रामायणापासून ते महाभारतापर्यंत ‘या’ कलाकारांनी केला आहे राजकारणात प्रवेश; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

हे देखील वाचा