Tuesday, July 9, 2024

धरम पाजींच्या हातून निसटले होते दोन सुप्रसिद्ध चित्रपट, याच संधीचे सोने करत अमिताभ बच्चन बनले सुपरस्टार

बॉलिवूड जग असे आहे की, इथे कोणाला कधी संधी मिळेल हे सांगता येत नाही. तसेच हातात आलेली सुवर्णसंधी कधी कोणाच्या हातून निसटेल याचीही काही खात्री नाही. बॉलिवूड जगात आजवर असे अनेक कलाकार होऊन गेले की, त्यांना अनेक मोठमोठे चित्रपट मिळालेे. मात्र, काही कारणास्तव त्यांनी या चित्रपटात भूमिका करायला नकार दिला होता आणि स्वतःचे नुकसान करून घेतले होते. एक वेळ अशी होती की, सुपरस्टार धर्मेंद्र यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली होती. याच संधीचा फायदा उचलत अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले होते. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत हे उघड केले आहे.

सध्याच्या काळात धर्मेंद्र हे सिनेजगतापासून दूर असले, तरीही वेगवेगळ्या विषयाबाबत ते आपल्या चाहत्यांशी बोलत असतात. कोरोनाच्या काळात आपण कसे आनंदी राहू शकतो, याचा नुकताच एक व्हिडिओ त्यांनी सादर केला होता, ज्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. नुकतेच धर्मेंद्र यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ त्यांना आधी ऑफर करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, त्यांना ‘आनंद’ चित्रपटात भूमिका देखील मिळाली, पण काही कारणास्तव त्यांना हे चित्रपट करता आले नाहीत. याच संधीचा फायदा करून घेत अमिताभ बच्चन हे खूप नावाजले गेले होते.

धर्मेंद्र म्हणाले, ‘हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, प्रकाश मेहरांचा जंजीर हा माझा प्रकल्प होता. मी हा चित्रपट पूर्णपणे करण्यास तयार होतो. मात्र, त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव मला चित्रपटातून बाहेर पडावे लागले.’ यानंतर धर्मेंद्र यांनी आनंद या चित्रपटाविषयीही चर्चा केली, ज्यात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता.

याबद्दल त्यांनी एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. धर्मेंद्र म्हणाले, ‘ऋषिकेश मुखर्जी माझे जवळचे मित्र होते. आम्ही ‘अनुपमा’,  ‘गुड्डी’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एक दिवस आम्ही बंगळुरूच्या विमानात एकत्र होतो. त्यांनी मला आनंद चित्रपटाची कहाणी सांगितली. मी त्याच्या प्रेमात पडलो आणि, मी चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. पुढे जाऊन मला असे सांगण्यात आले की, हा चित्रपट दुसरा अभिनेता करणार आहे.’

धर्मेंद्र म्हणाले, ‘मी खूप अस्वस्थ झालो होतो, काही पेग अल्कोहोल पिऊन मी रात्रभर ऋषिकेश मुखर्जीला फोन केला आणि वारंवार सांगितले की, आनंद चित्रपट माझा आहे. तथापि, या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट विचार केलेला अभिनेता घेतला होता. मला हरकत नव्हती. मला ऋषिकेश मुखर्जी आठवतात. ते एक उत्तम चित्रपट निर्माते होते.’ विशेष म्हणजे ‘आनंद’ आणि ‘जंजीर’ हे दोन्ही चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होते, परंतु हे दोन्हीही चित्रपट धर्मेंद्र यांच्या हातातून गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

-चित्रपट फ्लॉप होऊनही तब्बल १ लाख रुपये फी वाढवायचे अभिनेते राज कुमार, विचारल्यावर दिले होते हैराण करणारे प्रत्युत्तर

-‘दया कुछ तो गडबड है’, म्हणत सीआयडी फेम शिवाजी साटम यांनी आपल्या भूमिकेने पाडली चाहत्यांच्या मनावर छाप, तब्बल ७ चित्रपटात बनले पोलीस

हे देखील वाचा