Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘प्रेग्नंट होते म्हणून वैभवशी लग्न केलं नाही तर…’, दिया मिर्झाने सांगितले लग्न करण्याचे कारण

‘प्रेग्नंट होते म्हणून वैभवशी लग्न केलं नाही तर…’, दिया मिर्झाने सांगितले लग्न करण्याचे कारण

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा पहिल्यांदाच आई होणार आहे. दियाने नुकतेच इंस्टा पोस्टच्या माध्यमातून तिच्या प्रेग्‍नेंसीची घोषणा केली. दियाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वैभव रेखाशी लग्न केले असून, ती प्रथमच आई होणार आहे. त्याचबरोबर लग्नानंतर इतक्या लवकरच आई होत आहे म्हणून, सोशल मीडियावर सतत तिला प्रश्न विचारले जात आहेत.

अशातच एका युजरच्या प्रश्नावर दिया मिर्झाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिया म्हणाली की, तिने वैभवशी लग्न करण्याचा निर्णय प्रेग्‍नेंसीमुळे नव्हता घेतला. या सुंदर प्रवासाबद्दल कुठल्याही प्रकारची लाज बाळगली नाही पाहिजे, आणि केवळ वैद्यकीय कारणास्तव तिने काही सांगितले नाही, असेही ती म्हणाली.

माध्यमांतील वृत्तांनुसार, एका युजरने दियाला विचारले की, “ही खूप चांगली गोष्ट आहे, अभिनंदन! पण समस्या अशी आहे की, तुम्ही लग्नापूर्वी गर्भधारणेची घोषणा का केली नाही? लग्नानंतर तुम्ही गर्भवती नाही झालात? लग्नाआधी बायका गरोदर का होऊ शकत नाहीत?”

युजरच्या या प्रश्नावर दिया म्हणाली, “एक रोचक प्रश्न. सर्वप्रथम, मी गर्भवती आहे, यामुळे आम्ही लग्न नाही केले, तर आम्हाला आमचे आयुष्य एकत्र घालवायचे होते, म्हणून आम्ही आधीपासूनच लग्नाची तयारी करत होतो.”

पुढे तिने लिहिले की, “जेव्हा आम्ही लग्नाचे नियोजन करत होतो, तेव्हाच आम्हाला माझ्या गरोदरपणाबद्दल माहिती मिळाली.  हा विवाह गर्भधारणेचा परिणाम नाही. काही वैद्यकीय कारणांमुळे आम्ही लग्नापूर्वी गर्भधारणेची घोषणा केली नव्हती. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. असे होण्याची मी बरेच वर्ष वाट पाहिली. वैद्यकीय व्यतिरिक्त मी कोणत्याही कारणास्तव हे लपवू शकत नाही.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनेक अडचणींना तोंड देऊन आई बनलीय दिया मिर्झा, शेअर केला ‘निअर डेथ एक्सपेरिअन्स’

अवघ्या 11 वर्षांच्या आदित्यची ‘बिग बीं’च्या शोमध्ये कमाल, पर्याय न वाचताच झटपट दिली प्रश्नांची उत्तरे

हे देखील वाचा