Wednesday, June 26, 2024

अभिनत्रीच्या चेहेऱ्यावर अन् हातावर जखमा असलेला फोटो पाहून चाहते पडले चिंतेत; नेमकं काय झालंय दिया मिर्झासोबत?

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी अचानक व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्न आणि त्यानंतर गरोदरपणाची बातमी देऊन, तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. आता अभिनेत्रीने एका फोटोद्वारे चाहत्यांना पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला आहे. दियाने अलीकडेच तिचा एक फोटो शेअर केला आहे, हे पाहून अभिनेत्रीचे चाहते चिंतेत पडले आहेत. फोटोमध्ये ती बर्फाळ प्रदेशात डोळे मिटून बसलेली दिसत आहे. पण, या फोटोमध्ये असे काहीतरी आहे, जे तिच्या चाहत्यांना चिंतित करत आहे.

दिया मिर्झाचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झालेल्या दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते सतत कमेंट करून, तिला तिच्या प्रकृतीबद्दल विचारत आहेत. दिया मिर्झाचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, तिला जखमा कशा काय झाल्या आहेत.

हा फोटो शेअर करत दिया मिर्झाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मेडिटेशन खूप शक्तिशाली आहे. काश प्रत्येकजण त्याची शक्ती समजू शकला असता. हे आयुष्य बदलवणारे आहे. मी घरी असो किंवा कामावर असो, मेडिटेशन माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे.” तिची दुखापत खरी नसल्याचे अभिनेत्रीच्या कॅप्शनवरून स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी दियाने हा फोटो ध्यान दिनानिमित्त शेअर केला आहे.

दियाचा हा फोटो ‘बिहाइंड द सीन’ आहे, ज्यामध्ये ती बर्फाळ ठिकाणी दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या कॅप्शनकडे लक्ष न देता, तिच्या तब्येतीची विचारणा सुरू केली. मात्र, जागतिक ध्यान दिनानिमित्त अभिनेत्रीने हा फोटो शेअर केला आहे.

कमेंट करत एका युजरने विचारले, “तुमचा चेहऱ्याला इजा कशी काय झाली?” त्याच वेळी दुसर्‍याने लिहिले, “ते ठीक आहे, पण चेहऱ्याला काय झाले?” दिया मिर्झाचा हा फोटो तिच्या ‘काफिर’ चित्रपटाच्या सेटचा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा