Friday, July 5, 2024

इमोशनल डॅडी! आलियाने करू नये लग्न, बाथरूममध्ये डांबण्याची वडिलांची धमकी

जवळपास जगातील सर्वच वडील आपल्या मुलीसाठी खूप पझेसिव्ह असतात. त्यांनी आपल्या मुलीला लहानाचं मोठं करताना खूप जपलेलं असतं. मुलीचा दुरावा काही क्षणासाठीही त्यांना सहन होत नसतो. असेच काहीसे बॉलिवूडची गोड अभिनेत्री आलिया भट्टच्या वडिलांबाबत आहे. सध्या आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परंतु तिच्या वडिलांना म्हणजेच महेश भट्ट यांना वाटतंय की, आलियाने लग्न करूच नये. कारण, त्यांना आलिया नेहमी आपल्या डोळ्यासमोर राहावी असं वाटतंय.

महेश भट्ट हे आपल्या दोन्ही मुलींबाबत खूपच पझेसिव्ह आहेत. विशेषत: तेव्हा, जेव्हा गोष्ट स्क्रीनवर किस आणि खऱ्या आयुष्यात डेटिंग करण्याबद्दल असते. एका जुन्या मुलाखतीत आलियाने याबाबत मोकळेपणाने चर्चा केली होती. तिने सांगितले होते की, मी लग्न करावे असे वडिलांना वाटत नाही. याव्यतिरिक्त महेश भट्ट यांनी धमकी देत म्हटले होते की, ते शाहीन आणि आलियाला बाथरूममध्ये डांबून ठेवतील आणि आपल्या नजरेआड जाऊ देणार नाहीत.

आलियाने म्हटले होते की, “माझ्या वडिलांनी मला म्हटले की, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीत. मी तुम्हाला खोलीत डांबून ठेवेल. हे खरंय. त्यांनी असेही म्हटले होते की, त्यांना आम्हा दोघींचे लग्न होताना पाहायचे नाही. ते असंच म्हणत नाहीयेत, ते खरंच असे करू शकतात. ते खूप पझेसिव्ह आहेत आणि आम्हाला लग्न करू नका असं म्हणतात.”

खरं तर १५ मार्चला आलियाने आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. हा खास दिवस आलियासाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी रिद्धिमा साहनी यांनी तिच्या मागील वाढदिवसाचे थ्रोबॅक फोटोही शेअर केले. या फोटोंमध्ये नीतू कपूर, रणबीर कपूर, सोनी राजदान, शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट दिसत आहेत. यावर्षी आलिया आपला बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत खास वाढदिवस साजरा करू शकली नाही.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर आलिया, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटही जवळपास पूर्ण झाला आहे. यावर्षी हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. आलिया करण जोहरच्या मल्टी-स्टारर ‘तख्त’ आणि एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ मध्येही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जाने क्या तुने कही…’, गाण्यावरील अभिनेत्री मिथिला पालकरच्या अदांंनी केले चाहत्यांना घायाळ, एकदा पाहाच

-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा