बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती आपले बिकिनीमधील बोल्ड आणि वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बीचवर फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट होता क्षणीच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिशा पटानी समुद्रकिनारी बांधलेल्या रेस्टॉरंटच्या परिसरात फिरत आहे. सोबतच ती तिच्या केसां शी खेळताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटी ती रॅम्प वॉक सारखी चालताना देखील दिसतेय. यावेळी तिने लाल बिकिनी टॉप आणि फ्लोरल प्रिंटसह शॉर्ट स्कर्ट घातला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये अमेरिकन रॅपर डोजा कॅटचे ‘वुमन’ हे गाणे वाजत आहे. (bollywood disha patani ramp walk on the beach in bikini skirt video went viral)
दिशा पटानीने हा व्हिडिओ शेअर करत ‘मिसिंग’ असे लिहिले आहे. यासह तिने बीच आणि फुलांचे इमोजी देखील कॅप्शनमध्ये पोस्ट केले आहेत. दिशाचा हा व्हिडिओ मालदीवच्या सुट्टीतील आहे. जो कदाचित टायगर श्रॉफने शूट केला असावा. काही दिवसांपूर्वी दिशा तिच्या कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. अभिनेत्री आता या सुट्ट्या खूप मिस करत आहे, म्हणूनच तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दिशा पटानीच्या या व्हिडिओवर इंडस्ट्रीमधील संबंधित तिच्या मित्रांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. वरदा खान नाडियाडवालाने फायर इमोजीवर पोस्ट केले आहे. त्याच वेळी, शेफ कॅल्विन चिउंगने लिहिले की, “आता पुन्हा रिचार्ज होण्याची वेळ आली आहे.” चित्रपट निर्माते अहमद खान यांची पत्नी शायरा खान यांनी कमेंटमध्ये फायर इमोजीसह ‘हॉट्टी’ लिहिले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिशा शेवटच्या वेळी सलमान खानसोबत ‘राधे: योर मोस्ट वॉंटेड भाई’ चित्रपटात दिसली होती. आगामी काळात ती ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. शिवाय मोहित सूरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’
-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’










