Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड अभिमानास्पद! बिग बी’ ठरले ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

अभिमानास्पद! बिग बी’ ठरले ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा भारतासाठी अभिमानास्पद काम केले आहे. त्यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह (FIAF) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या संरक्षणाच्या कार्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सिनेसृष्टीच्या या महानायकाने, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्ह या पुरस्कार सोहळ्यातील काही फोटो त्यांच्या चाहत्यांसह, सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच, फोटो शेअर करून त्यांनी अमेरिकन चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मार्टिन स्कोर्से आणि चित्रपट लेखक ख्रिस्टोफर नोलन यांचे आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय नागरिक आहेत. शुक्रवारी (19 मार्च) बिग बी यांना व्हर्च्युअल सोहळ्यात या पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “एफआयएएफ पुरस्कार- 2021 मिळाल्याने मला खूप सन्मान वाटतो. आज सोहळ्यात मला हा पुरस्कार दिल्याबद्दल, मी एफआयएएफ, मार्टिन स्कोर्से आणि ख्रिस्टोफर नोलन यांचे आभार मानतो. भारताचा चित्रपट वारसा जपण्याची आमची वचनबद्धता अटळ आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आमचे चित्रपट जपण्यासाठी, देशव्यापी चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहील.

या कार्यक्रमात मार्टिन स्कोर्से आणि ख्रिस्टोफर नोलन हे देखील उपस्थित होते. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने या पुरस्कारासाठी अमिताभ यांच्या नावाची नोंद केली होती. फिल्म हेरिटेज ही एक एनजीओ संस्था आहे, जी चित्रपटांच्या नोंदणी आणि चित्रपटाच्या वारसा अभ्यासावर कार्य करते.

या पुरस्कार सोहळ्यात मार्टिन स्कोर्से यांनी बिग बींचे कौतुक करत असे सांगितले की, “अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत चित्रपटांचा वारसा जपण्यासाठी विलक्षण कामगिरी बजावली आहे. फिल्म हेरिटेज फाउंडेशनपासून मी भारतातील चित्रपटांच्या संरक्षणाचे निरीक्षण करत आहे. अमिताभ बच्चन या दिशेने कसे काम करतात हे मला चांगलेच ठाऊक आहे.’

जया बच्चन यांच्या सल्ल्यानुसार, 2015 मध्ये बिग बींनी जुन्या चित्रपटांच्या संरक्षणासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास 60 जुने चित्रपट रिस्टोर करून ठेवले आहेत. जुन्या चित्रपटांच्या जीर्णोद्धारासाठी ते अनेकदा आवाहनही करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भाजपला मिळाला पडद्यावरील ‘श्रीराम’, वाचा रामायणाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेते अरुण गोविलांबाबत काही खास गोष्टी

-‘या’ कारणामुळे बनावे लागले अभिनेत्री; वयाच्या सोळाव्या वर्षीच बांधली होती लग्नगाठ, वाचा ७ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

-पुणे एफटीआयमध्ये आपल्या बॅचचे टॉपर होते ‘नवीन निश्चल’, मिळाला जसा हवा होता तसाच मृत्यू, टाका एक नजर

हे देखील वाचा