Monday, July 8, 2024

फीफा वर्ल्डकपचे एँथम साँग रिलीज, नोरा फतेहीने भन्नाट डान्स करून रचला इतिहास

बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही सध्या फीफा विश्वचषक स्पर्धेमुळे चर्चेत आहे. पुढील महिन्यापासून फीफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कतार येथे होणाऱ्या या स्पर्धेत अभिनेत्री नोरा फतेही परफॉर्म करणार आहे. यास्पर्धेत नोरा ही एकमेव बॉलिवूड अभिनेत्री असेल, जी फीफामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

अभिनेत्री कोणत्या गाण्यावर डान्स करणार आहे याचा नुकताच खुलासा तिने केला आहे. अभिनेत्रीने फीफासाठी तिच्या ‘लाइट द स्काय’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या गाण्यात ती फक्त डान्स करताना दिसत नाही आहे, तर गाणेही गात आहे. फीफाने तिचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आणि ट्विटरवर शेअर केला आहे. नोरा फतेहीने देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

शकीरा आणि जेनिफर लोपेझनंतर नोरा फतेही फीफा विश्वचषकमध्ये एन्थम सॉन्गवर परफॉर्म करणार आहे. भारताचे,  विशेषतः दक्षिण पूर्व आशियाचे, जगात प्रतिनिधित्व करणारी नोरा ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. ज्या गाण्यावर नोरा डान्स करणार आहे ते रेडऑनने संगीतबद्ध केले आहे. फीफाच्या उद्घाटन समारंभात तसेच समारोप समारंभात नोरा परफॉर्म करणार आहे. समारोप समारंभात ती एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.

अभिनेत्री नोरा आशियाचे प्रतिनिधित्व करणार
शकीराने 2010 मध्ये ‘वाका-वाका’वर परफॉर्मन्स केला होता. हे गाणेही त्यांनी गायले आहे. हे गाणे आजवर तरुणांमध्ये हिट आहे. 2014 मध्ये, जेनिफर लोपेझ ब्राझीलमधील रॅपर पिटबुलसोबत ‘वुई आर वन’ या फीफा वर्ल्ड कप अँथम गाण्यात दिसली होती. भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी नोरा ही एकमेव अभिनेत्री आहे. तिच्या कामगिरीवर लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

32 संघ 64 सामने खेळणार आहेत
मध्यपूर्वे भागातील एखादा देश फीफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ असेल. या स्पर्धेत 32 संघांचे एकूण 64 सामने होणार आहेत. जगभरातील सर्वोत्तम फुटबॉलपटू यात सहभागी होणार आहेत. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा रोनाल्डोही यात खेळणार आहे. दोन्ही खेळाडूंसाठी हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिमान असायला हवा! दीपिकाने फॅशन शोमध्ये आई-वडिलांसोबत पसरवले सौंदर्याचे जलवे, पाहा व्हिडिओ

टॅलेंट लागताे भावा! उर्फी जावेदचा आतापर्यंतचा सर्वात भारी लूक; अभिनेत्रीने परिधान केले तरी काय?

हे देखील वाचा