Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड अखेर प्रतीक्षा संपली! ‘बीए पास ३’चा ट्रेलर झाला रिलीझ, सोबतच चित्रपटाची रिलीझ डेटही जाहीर

अखेर प्रतीक्षा संपली! ‘बीए पास ३’चा ट्रेलर झाला रिलीझ, सोबतच चित्रपटाची रिलीझ डेटही जाहीर

बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बीए पास ३’ चा ट्रेलर नुकताच रिलीझ झाला आहे. हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होता. २०१२ मध्ये आलेल्या ‘बीए पास’ या चित्रपटाचा हा तिसरा सिक्वल आहे. अलीकडेच रिलीझ झालेल्या ‘बीए पास ३’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहे. दिग्दर्शक-निर्माता नरेंद्र सिंग पुन्हा एकदा बीए पास फ्रँचायझीसह परत आले आहेत, जे ‘बीए पास ३’ आहे.

‘बीए पास ३’ हा चित्रपट मे महिन्याच्या १ तारखेला, ओटीटी प्लॅटफॉर्म फिल्मीबॉक्स ऍपवर रिलीझ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटासोबतच फिल्मीबॉक्स हे ऍप देखील लाँच करण्यात येणार आहे. ‘बीए पास ३’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट अशा अवांछित नात्याभोवती फिरत आहे, जे बनतात आणि त्यानंतर त्याचा वाईट परिणामही दिसायला लागतो. हा चित्रपट एक बेरोजगार तरुण अंशुलच्या आयुष्याबद्दल आहे, जो एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो.

या चित्रपटाविषयी बोलताना नरेंद्र सिंग म्हणाले की, “फिल्मीबॉक्स ऍप लाँच करण्याबद्दल मी खूप उत्सुक आहे. ‘बीए पास ३’ ने हा उत्सव दुप्पट झाला आहे, कारण या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणारा हा पहिला चित्रपट असेल. मला आनंद आहे की, कोरोनाने मला डिजिटल होण्यास प्रेरित केले. कारण प्रेक्षक ओटीटीवर जास्त प्रमाणात डिजिटल सामग्री पाहत आहेत.”

नरेंद्र सिंग निर्मित आणि दिग्दर्शित ‘बीए पास ३’ या चित्रपटामध्ये सनी सचदेवा, अंकिता चौहान, अरमान संधू आणि अंकिता साहू यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा दीप चुघ आणि नरेंद्र सिंग यांनी लिहिली आहे, तर संगीत अल्ताफ-मन्नी यांचे आहे. सोशल मीडियावर ‘बीए पास 3’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोबतच ते चित्रपटाचीही वाट पाहत आहेत.

‘बीए पास’ हा चित्रपट २०१२ मध्ये आला होता. या चित्रपटात शिल्पा शुक्ला, शादाब कमल, राजेश शर्मा आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले होते, तर चित्रपटाची निर्मिती नरेंद्र सिंग यांनी केली होती. सन २०१५ मध्ये या चित्रपटाचा दुसरा सिक्वल, ‘बीए पास २’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीझ झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नी सुगंधा मिश्राविषयी बोलताना संकेत भोसलेला अश्रू अनावर; बोलता बोलताच लागला रडू, पाहा भावुक व्हिडिओ

-‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा धर्मेंद्र आणि सनी देओलमध्ये होते भांडण; पाहून रितेश अन् जेनेलियाही लागले हसू

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा