Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड काय सांगता! भारतात हिट झालेल्या ‘या’ चित्रपटांवर परदेशात घातली बंदी; कारणही घ्या जाणून

काय सांगता! भारतात हिट झालेल्या ‘या’ चित्रपटांवर परदेशात घातली बंदी; कारणही घ्या जाणून

आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला एक वेगळे वजन आहे, एक वेगळी दिशा आहे. भारत ही संतांची भूमी आहे. या भूमीच्या इतिहासाला थोर पुरुषांचा वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्यासाठी झटलेल्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती इथे दिलेली आहे, आणि चित्रपटांमधून देखील अनेक दिगदर्शक अशाच काही भारताचा इतिहास आणि वारसा जपणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करत असतात. परंतु अनेकदा या चित्रपटांवर परदेशात बंदी घातली जाते. भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटांवर परदेशात मात्र त्यांच्या कथेमुळे आणि काही सीनमूळे बंदी घातली जाते.

नुकताच अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतामध्ये एवढी प्रसिद्धी मिळवलेल्या या चित्रपटावर काही देशांमध्ये मात्र बंदी आणली गेली आहे. सौदी अरेबिया, कुवैत आणि कतार या देशांमध्ये ‘बेलबॉटम’ या चित्रपटावर बंदी आहे. (Bollywood films that have been banned in other country)

आपल्या देशात हिट झालेल्या चित्रपटांना परकीय देशांमध्ये बंदीचा सामना करावा लागणे ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी देखील भारतातील अशा अनेक चित्रपटांवर बंदी आणली गेली आहे. अशाच काही हिट चित्रपटांवर आणलेल्या बंदीविषयी जाणून घेऊया.

१. बॉंबे
साल १९९५ मध्ये ‘बॉंबे’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. बाबरी मशिदीच्या विध्वंसावर आधारित या चित्रपटाची कहाणी होती. या चित्रपटामध्ये हिंदू- मुस्लिम जातीच्या मुला- मुलीमध्ये प्रेम संबंध असल्याचे दाखवण्यात आले. त्या दरम्यान हिंदू- मुस्लिमांमध्ये अनेक दंगली होत होत्या. या चित्रपटाच्या कहाणीमुळे सिंगापूरमध्ये त्याच्यावर बंदी आणली गेली.

२. ओएमजी (ओ माय गॉड)
उमेश शुक्ला दिगदर्शित ‘ओएमजी (ओ माय गॉड)’ या चित्रपटाला भारतात भरपूर पसंती मिळाली. हा चित्रपट सर्व धर्मातील देवांच्या अस्तित्वावर आधारित होता. आपण देव मंदिरात नाही, तर माणसात व प्रत्येक सजीवात शोधला पाहिजे, अशा आशयाचा हा चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथेमुळे अरेबिक देशांमध्ये त्यावर बंदी आणली गेली.

३. एक था टायगर
सलमान खान आणि कॅटरिना कैफ अभिनित ‘एक था टायगर’ या चित्रपटाने भारतातच नाही, तर इतरही देशांमध्ये चांगलीच कमाई केली. एका रॉ एजंटच्या प्रेम कहाणीवर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. दहशतवादी हल्ले व आतंकवादावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला होता. या चित्रपटाची कथा पाकिस्तानला रुचली नाही, त्यामुळे पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी आणली गेली.

४.उडता पंजाब
साल २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटामध्ये ड्रग्ज तस्करीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. शाहिद कपूर अभिनित या चित्रपटावर सुरुवातीला भारतात देखील पंजाब सरकारने बंदी आणली होती. चित्रपटातील काही सीन काढल्यानंतर भारतात हा चित्रपट प्रदर्शित करण्यास मंजुरी मिळाली. परंतु पाकिस्तानमध्ये त्यावर बंदी कायम राहिली.

५. द अटॅक ऑफ २६/११
आजही ‘द अटॅक ऑफ २६/११’ हा चित्रपट पाहिल्यावर जुन्या आठवणींनी डोळ्यात पाणी येते. साल २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घातली गेली. साल २००८मध्ये झालेल्या हल्ल्यांची व कसाबला दिलेल्या शिक्षेची सर्व चित्रे या चित्रपटांमध्ये रेखाटली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा