Friday, July 5, 2024

‘ड्रीम गर्ल’च्या एका कॉलने बदलले होते ‘किंग खान’चे आयुष्य! पाया पडत शाहरुखने मानले होते अभिनेत्रीचे आभार

शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीची सुरूवात ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या टीव्ही मालिकांमधून केली होती. मात्र, टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या ‘किंग खान’बद्दल क्वचितच चाहत्यांना माहिती असेल की, त्याला बॉलिवूडमध्ये येण्याची संधी हेमा मालिनी यांनी दिली होती. टीव्हीवर ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ मालिका पाहिल्यानंतर बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ने एक दिवस शाहरुखला फोन करून चित्रपटासाठी ऑफर दिली. पण अभिनेत्याला यावर विश्वासच बसला नाही.

शाहरुख खानने एका पुरस्कार सोहळ्यात हेमा मालिनीसमोरच तो घडलेला किस्सा सांगितला, जेव्हा त्याला चित्रपटाच्या ऑफरचा फोन आला होता. शाहरुखने सांगितले की, “त्या दिवसात तो दिल्लीत असायचा, तेव्हा हेमा मालिनी यांच्या चुलत बहिणीचा फोन आला आणि तिने सांगितले की, हेमा मालिनीला तुझ्याशी बोलायचे आहे. त्याला यावर विश्वास नव्हता, परंतु तो बोलला. हेमा त्याच्या चेहर्‍याचे कौतुक करत म्हणाल्या की, “मला तुला माझ्या चित्रपटात कास्ट करायचे आहे. हे ऐकून त्याला वाटले की, दिल्लीची एक मुलगी हेमा मालिनी बनून त्याला पटवण्याचा प्रयत्न करत आहे.”

काही काळानंतर चित्रपटाचे काम सुरू होऊ लागले आणि हेमाच्या भेटीसाठी शाहरुख हेमाच्या घरी पोहोचला. तिथे त्याने धमेंद्र यांची भेट घेतली. हेमाने शाहरुखची धर्मेंद्रशी ओळख करून दिली आणि म्हणाल्या, “हा माझ्या नव्या चित्रपटाचा नायक आहे.” यावर धर्मेंद्र म्हणाले, “हो हो, हा चांगला आहे, याला घ्या.” मग तेव्हा त्याला खात्री झाली की, हो हे सर्व सत्य आहे.

हा संपूर्ण किस्सा आठवून शाहरुख खान हेमा मालिनी यांच्या पाया पडला आणि म्हणाला की, “तुम्ही माझा जीव जरी मागितला, तरीही मी देऊ शकतो.”

त्यावेळी ‘दिल आशना है’ चित्रपटासाठी हेमा यांनी शाहरुखला कास्ट केले होते. हेमा मालिनी दिग्दर्शित ‘दिल आशना है’ हा चित्रपट साल 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी शाहरुखचा पहिला ‘दिवाना’ हा पदार्पण चित्रपट रिलीज झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा