‘हेरा फेरी’ 2000 साली रिलीज झालेला या चित्रपटाने प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केले होते. त्या नंतर या चित्रपटाचा दुसरा भाग आला. ह्या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांना पसंती दिली. पण आता या चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. पण हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. आधी अक्षय कुमार याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर अभिनेता अक्षय कुमार ऐवजी अभिनेता कार्तिक आर्यन याला चित्रपटात घेण्यात आले आहे अशी चर्चा रंगली. परंतु अक्षय याला या चित्रपटासाठी मनवण्यात आले असे समोर आले. पण आता या चित्रपटाबाबत आणखी एक बाब समोर आली आहे. फरहाद सामजी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. परंतु प्रेक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटर वर ‘रिमूव फरहाद फ्रॉम हेराफेरी’ हा ट्रेंड चालू केला आहे. फरहाद सामजी यांच्यावर नेमके चाहते का नाराज आहे? ते आपण बघूया…
हेरा ‘फेरी’ चित्रपटातून फरहादला हटवा हा ट्रेंड ट्विटरवर चालू आहे आणि त्यावर 30,000 हून अधिक ट्विट केले आहेत. प्रेक्षक का नाराज आहे फरहाद सामजी यांच्यावर? नुकतीच फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित वेब सीरिज पॉप कौन है,’ जे नुकतीच प्रदर्शित झाली. ही मालिका प्रेक्षकांच्या फारशी पसंतीस उतरली नाही. अशा परिस्थितीत, हेरा फेरी 3 चित्रपटाबाबतीत चाहते बद्दल खूप घाबरले आहेत. त्यामुळे हेरा फेरीमधून फरहादला हटवा ट्विटरवर ट्रेंड होत आहे. याआधी फरहादने हाऊसफुल 4, बच्चन पांडे, बू सबकी फतेगी इत्यादी दिग्दर्शित केले आहेत, जे फ्लॉप ठरले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?
अभिनेता आकाश ठोसर याने लग्नासाठी घातली अनोखी अट; बातमी वाचाच