Sunday, June 2, 2024

बिग बींच्या ‘या’ गीतांशिवाय होळी सणच आहे अपूर्ण; ‘रंग बरसे’ तर आहे सर्वात हिट!

होळीचा सण ‘होळीगीत’ न ऐकता पूर्णपणे अपूर्ण आहे. ज्याप्रमाणे बाकीचे उत्सव मिठाईशिवाय पूर्ण होत नाही, त्याच प्रकारे हा सण गीताशिवाय पूर्ण होत नाही. बॉलिवूडची अशी बरेच गाणे आहेत, ज्यांच्याशिवाय होळी अपूर्णच राहते. विशेषत: सिलसिला या चित्रपटाच्या ‘रंग बरसे’ गाण्याशिवाय या उत्सवात काही मजा नाही. अमिताभ बच्चन यांचे होळीचे गाणे ऐकून तर, होळी साजरी करणे आणखी मजेदार होते. बऱ्याच वर्षांनंतरही बिग बींची होळीगीते नवीनच वाटतात.

बागबान- होरी खेले रघुबीरा
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी अभिनित ‘बागबान’ मधील ‘होरी खेले रघुबीरा’ हे एक संस्मरणीय गाणे आहे. हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता आणि आजही याचे होळी गीत धमाल करते.

सिलसिला- रंग बरसे
सन 1981 मध्ये आलेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे’ या गाण्याशिवाय होळी खेळण्यात काही मजा नाही. अमिताभ बच्चन यांनी गायलेले आणि त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी लिहिलेले हे गाणे आजही होळीची मजा दुप्पट करते.

शोले- होली के दिन
1975च्या ‘शोले’ चित्रपटातील आणखी एक न विसरणारे होळी गाणे म्हणजे ‘होली के दिन’. त्याशिवाय होळी साजरी करणे अपूर्ण आहे. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले होते.

वक्त- डू मी अ फेवर लेट्स प्ले होली
सुनिधी चौहानने गायलेले ‘डू मी अ फेवर लेट्स प्ले होली’ हे देखील तुमच्या प्लेलिस्टचा भाग असायला हवे. अमिताभ यांनी 2005 मध्ये अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत या चित्रपटात भूमिका साकारली होती, ज्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते.

मोहब्बते- सोनी-सोनी
जरी अमिताभ बच्चन ‘सोनी-सोनी’ गाण्याचा भाग नव्हते, परंतु, 2000 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या गाण्यांव्यतिरिक्त बॉलिवूडची अशी अनेक गाणी आहेत, ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या होळीच्या उत्सवाची मजा दुप्पटीने वाढवू शकता. यामध्ये दीपिका-रणबीरच्या ‘बलम पिचकारी’, अक्षय कुमार-भूमि पेडणेकरच्या ‘गोरी तू लट्ठ मार’ आणि शाहरुख खान, जूही चावला आणि सनी देओल यांच्या ‘अंग से अंग लगाना’ या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांनी प्रियांकाच्या अंगावर चक्क पाण्याने भरलेली बादली केली होती रिकामी, निक बघतच राहिला; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा