बॉलिवूड गायक आणि अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad)मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऋतिक रोशनसोबत रिलेशनशिपमुळे ती अनेकदा चर्चा रंगलेली दिसते. अनेकादा त्याच्या नात्यामुळे दोघांनाही ट्रोल केले जाते. यावेळीही असेच काही घडले आहे. सबाने ट्रोर्लसला सडेतोड उत्तर देऊन बोलती बंद केली आहे. एवढंच नाही तर तिने या युजरच्या अकाउंटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
सबा आझादने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिला ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्यांच्या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याखाली पोस्ट लिहिली आहे. यासोबत युजरच्या बायोचाही स्क्रिनशॉट शेअर केलाय तिने या युजरने ‘फन, फ्री, हॅप्पी, प्रेम, प्रेम सगळीकडे असते. असे लिहिले आहे. या युजरने सबावर कमेंट करताना लिहिले की, “तू खूपच घाणेरडी दिसत आहेस.”
सबा आझादने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, “ही श्रुती आहे. जाहिरपणे ती तिच्या प्रेम असलेल्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. पण ती तिच्या तिरस्कार शेअर करण्यासाठी मला फॉलो करते. हिच्यासारखे अनेकजण आहेत. श्रुतीप्रमाणे वागू नका. मला अनफॉलो करण्यासाठी तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. दुर्दैवाने अद्याप श्रुतीला ब्लॉक बटणाबाबत माहीत नाही. पण तिला ते लवकरच कळेल.”
दरम्यान ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचा प्रेम सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. दोघंही अनेकदा बॉलिवूड पार्टी, एअरपोर्ट, डिनरसाठी एकत्र दिसतात. आतापर्यंत दोघांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या नात्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केले जाते. सबाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘दिल कबड्डी’, ‘फील लाइक इश्क’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अखेरची ‘रॉकेट बॉइज’ वेब सीरिजमध्ये दिसली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अल्लाह’साठी आणखी एका अभिनेत्रीने सोडले कलाविश्व, पोस्ट होतेय व्हायरल
देवा रे देवा! कॅटरिनाचा ‘असा’ अवतार बघून सिद्धांत अन् ईशानही घाबरले, व्हिडिओ पाहाच