प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर जितकी चांगली गायिका आहे, तितकीच चांगली ती एक बहीण, मुलगी आणि पत्नी देखील आहे. नेहा तिच्या कुटुंबावर खूप प्रेम करते आणि त्यांची खूप काळजी घेते. नेहाचे कुटुंबीयही तिच्यावर तितकेच प्रेम करतात. गायिका आपल्या कुटुंबाला खुश करण्यासाठी आणि विशेष फील करून देण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आता अलीकडेच नेहाने तिच्या पालकांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
नेहाने इंस्टाग्रामवर सेलिब्रेशन केलेले बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा पती रोहनप्रीत सिंग, भाऊ टोनी कक्कर, बहीण सोनू कक्कर, आई-वडील आणि काही जवळचे लोक दिसले आहेत. फोटोंमध्ये नेहाच्या आई आणि वडिलांनी गुलाबाच्या फुलांचा हार घातला आहे आणि सर्व लोक केकसमोर उभे राहून पोज देत आहेत.
फोटो शेअर करत गायिकेने लिहिले की, “तुमच्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! तुम्ही दोघांनी आम्हाला नेहमीच प्रेम दिले आहे, त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही. माता राणीला हीच विनंती आहे की, तुम्ही दोघे सदैव आनंदी राहा.”
सेलिब्रेशनच्या फोटोंव्यतिरिक्त नेहाने आई आणि वडिलांसोबतचे तिचे काही गोंडस फोटोही तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती तिच्या आईला किस करताना दिसत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नेहा सध्या सोनी टीव्हीच्या सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल ११’ मध्ये जज म्हणून दिसत आहे. अलीकडेच नेहा सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाली होती. किशोर कुमार एपिसोडच्या वेळी नेहाने किशोर दाची काही गाणी गायली, जी प्रेक्षकांना अजिबात आवडली नाहीत आणि त्यानंतर नेहा जोरदार ट्रोल झाली. गायिकेने नुकतेच एक नवीन गाणे रिलीझ केले आहे, ज्याचे बोल ‘खड तैनू में दस्सा’ असे आहे. या गाण्यात ती पती रोहनप्रीत सिंगसोबत दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती