Tuesday, July 9, 2024

बिग बींच्या जुहू स्थित बंगल्यात बॉम्ब? दोन संशयितांना करण्यात आले अटक

बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यात आणि मुंबईच्या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांवर बॉम्ब ठेवल्याची बातमी कळताच, सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून ही माहिती दिली होती. दरम्यान, नंतर ही माहिती चुकीची निघाली आणि या संदर्भात ठाणे जिल्ह्यातून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, अटक केलेल्यांपैकी एक ट्रकचालक आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांना शुक्रवारी रात्री कॉल आला. त्यानंतर या चार ठिकाणी शोध घेण्यात आला, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. ते म्हणाले, “आतापर्यंत या ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतु तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.” ते म्हणाले की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. (bollywood information about placing bomb on amitabh bachchan bungalow turned out to be fake 2 people in custody)

पोलीस अधिकारी म्हणाले की, “मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास फोन आला. ज्यात फोन करणाऱ्याने सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भायखळा, दादर रेल्वे स्थानके आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यात बॉम्ब ठेवण्यात आले आहेत.”

पुढे ते म्हणाले की, “फोन आल्यानंतर सरकारी रेल्वे पोलीस, रेल्वे संरक्षण दल तसेच बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली.” त्यांनी सांगितले की, बीएसडीएस आणि श्वान पथकांच्या मदतीने सीएसएमटी स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्म, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय, पार्किंग क्षेत्र आणि इतर परिसरात शोध घेतला गेला. दहशतवादविरोधी पथक (एटीएस), क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी), मरीन ड्राइव्ह आणि आझाद मैदान यासह काही स्थानिक पोलीस ठाण्यांतील पथकेही या कारवाईत सामील झाली होती. परंतु अनेक तासांच्या शोधानंतर सीएसएमटी आणि इतर तीन ठिकाणी संशयास्पद काहीही आढळले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा