Wednesday, July 3, 2024

‘अगदी अश्शा पद्धतीने करणार लग्न’, जान्हवी कपूरने लग्नाच्या पश्नावर दिलं हे उत्तर

अभिनेत्री जान्हवी कपूर अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे. चाहते तिच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत असतात. ती आता चित्रपटांमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि हळू हळू असले तरी तिची कारकीर्द पुढे जात आहे.

अलीकडेच जान्हवी कपूरला तिच्या लग्नाबद्दल विचारले असता, तिने अतिशय रंजक उत्तर दिले. तिच्या उत्तरातून चाहत्यांना कल्पना आली आहे की, अभिनेत्रीला साधेपणा आवडतो. तिला लग्नही तशाच प्रकारे करायचे आहे.

तिला भव्य लग्न करायचे नाही, असे अभिनेत्रीने सांगितले. तिला तिरुपतीमध्ये साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे. एका मुलाखतीदरम्यान, जान्हवीला विचारण्यात आले होते की लग्नाच्या लूकसाठी तिचे प्लॅन काय आहेत? यावर अभिनेत्रीचे अनोखे उत्तर मिळाले.

ती म्हणाली, ‘सुरुवातीपासूनच माझ्या मनात एक स्पष्ट चित्र आहे. तिरुपतीमध्ये मी लग्न करीन आणि लग्नात फक्त कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील. मी सोने आणि कांजीवरम साडी घालीन. माझ्या केसांमध्ये बरीच मोगऱ्याची फुले असतील. तसेच, माझे पती लुंगीमध्ये असतील आणि आम्ही केळीच्या झाडाच्या पानांवर खाऊ.” आता जान्हवीची ही इच्छा कधी पुर्ण होतेय हे पाहाणे औत्युक्याचे ठरणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी आजकाल तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील जान्हवीचा लूक समोर आला होता. यात ती पंजाबी लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेन आहेत. पंकज मत्ता यांनी त्याची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली असून यात दीपक डोबरियाल, सुशांत सिंग आणि जान्हवी कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

याशिवाय जान्हवी ‘दोस्ताना 2’ चित्रपटातही दिसणार आहे. लवकरच जान्हवी ‘रुही’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. तिच्या व्यतिरिक्त अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मा हेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ‘रुही’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजन यांनी केले आहे.

हे देखील वाचा