मायानगरी मुंबईमधील कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांनी सर्वांची झोप उडवली आहे. मग तो सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी, प्रत्येकासाठी कोरोना डोकेदुखी बनला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईमध्ये कर्फ्यूचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा मजेदार अंदाज पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये जान्हवी तिच्या मित्र-मैत्रिणींसह दिसली आहे. ज्यामध्ये ती कार्डी बीच्या म्युझिक व्हिडिओ ‘अप’ वर पूल साइडमध्ये नृत्य करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. खास बाब म्हणजे, जान्हवीच्या या व्हिडिओवर केवळ तिचे चाहतेच नव्हे, तर अनेक सेलिब्रिटीजही प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओ शेअर करत जान्हवीने कॅप्शनमध्ये आशा व्यक्त केली आहे की, कदाचित ती हे आणखी चांगल्या प्रकारे करू शकली असती. अभिनेत्रीने लिहिले, “मला खरंच वाटते की आम्ही यापेक्षा आणखी चांगले करू शकलो असतो, परंतु..” याव्यतिरिक्त तिने काही इमोजीसुद्धा बनवल्या आहेत. व्हिडिओमध्ये जान्हवी जांभळ्या रंगाची हूडी आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे.
जान्हवी कपूरने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, मसाबा गुप्ता आणि स्टायलिस्ट तान्या घावरी यांनीही व्हिडिओवर कमेंट केली आहे. राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत जान्हवी अलीकडेच ‘रुही’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटामध्ये दिसली होती. याशिवाय ती ‘दोस्ताना 2’ मध्येही दिसणार आहे. चित्रपटात अभिनेत्रीची जोडी कार्तिक आर्यनसोबत दिसणार होती, पण आता कार्तिक या चित्रपटाचा भाग असणार नाही.