Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड ‘गोविंदा गोविंदा’, म्हणत जान्हवीने काढला टॅटू, तर ‘या’ कलाकारांनीही टॅटूद्वारे व्यक्त केलंय आपलं प्रेम

‘गोविंदा गोविंदा’, म्हणत जान्हवीने काढला टॅटू, तर ‘या’ कलाकारांनीही टॅटूद्वारे व्यक्त केलंय आपलं प्रेम

जान्हवी कपूर सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीने एक टॅटू काढला आहे, ज्यामुळे ती सध्या खूप चर्चेत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त जान्हवीनेच नव्हे तर खूप कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढले आहेत. एक नजर टाकूयात अशा कलाकारांवर.

जान्हवीने कपूरने नुकताचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये ती टॅटू काढताना दिसत आहे . हा टॅटू तिच्यासाठी खुप स्पेशल आहे. कारण हा टॅटू तिची आई म्हणजे श्रीदेवी यांच्या अक्षरात आहे. त्या टॅटूमध्ये लिहिलं आहे की, ‘आय लव्ह माय लब्बू’. हा टॅटू तिने तिच्या पायावर काढला आहे. तिने टॅटू काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती टॅटू काढताना गोविंदा, गोविंदा असे ओरडताना दिसत आहे. (bollywood janhvi kapoor tattooed mother sridevi handwritten notes check out other celebs and their tattoos)

Photo Courtesy Instagramjanhvikapoor

प्रियांका चोप्रा
तसेच ग्लोबल एक्ट्रेस प्रियंका चोप्रा जोनास हिला आपल्या वडीलांचा खूप लगाव होता. त्यामुळे तिने देखील टॅटू काढला होता. तिने हा टॅटू तिच्या हातावर काढला होता . टॅटूमध्ये लिहिलं आहे की, ‘डॅडीज लिटिल गर्ल’.

Photo Courtesy Instagrampriyankachopra

अर्जुन कपूर
अर्जुन कपूर याने देखील टॅटू काढला आहे. तो टॅटू त्याने आपली बहीण अंशुलासाठी काढलेला आहे. अर्जुनने A असे अक्षरात लिहले आहे .हा टॅटू त्याच्या हातावर गोंदवला आहे.

Photo Courtesy Instagramarjunkapoor

श्रुती हासन
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन ही कमल हासन यांची मुलगी आहे. तिने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे . पण जेवढं नाव तिने टॉलिवूडमध्ये कमावलं, तेवढं हिंदी बॉलिवूडमध्ये नाही कमावू शकली. आज ती टॉलिवूडमध्ये एक मोठं नाव आहे. श्रुती पण तिच्या टॅटूमुळे खुप चर्चेत होती. तिने तिच्या पाठीवर टॅटू काढला आहे . टॅटूमध्ये तिने तमिळ भाषेत तिचं नाव लिहिलं आहे.

Photo Courtesy Instagramshrutzhaasan

अक्षय कुमार
खिलाडी अक्षय कुमारने देखील टॅटू काढला आहे. त्याने त्याच्या खांद्यावर टॅटू काढला आहे. त्याची बायको ट्विंकल खन्ना हिचं निक नेम टीना आहे. त्यामुळे अक्षय कुमारने टीना नावाचा टॅटू काढला आहे. तसेच त्याच्या मुलाच्या नावाचा पण टॅटू त्याने काढला आहे.

Photo Courtesy Instagramakshaykumarr

सोनाक्षी सिन्हा
तसेच सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या डाव्या पायावर टॅटू काढला आहे. लोकांच्या नजरा खिळून राहतील असा टॅटू तिने गोंदवलेला आहे.

Photo Courtesy Instagramaslisona

हर्षवर्धन कपूर
सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन याने आपल्या दोन्ही बहिणींची नावे पाठीवर टॅटूने गोंदली आहेत. टॅटूमध्ये सोनम आणि दुसरीकडे रियाचे नाव काढले आहे.

सान्या मल्होत्रा

Photo Courtesy Instagramsanyamalhotra


तसेच सान्या मल्होत्राच्या हातावर संस्कृतच्या स्लोगनचे टॅटू काढलेला दिसतोय.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा