‘बिग बॉस १२’ ची स्पर्धक जसलीन माथरू अलीकडेच रुग्णालयात दाखल झाली होती. जसलीनने एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले होते की, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तिला त्याच्या घराचे वातावरण पाहून खूप धक्का बसला, ज्यामुळे तिला खूप ताप आला होता. जसलीन त्या कलाकारांपैकी एक आहे, जे दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. नुकतेच जसलीनने सांगितले की, तिला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
https://www.instagram.com/tv/CTd9rHmoTMc/?utm_source=ig_web_copy_link
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जसलीन माथरूने तिच्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ती म्हणाले, “मला आज रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, पण ताप अजूनही आहे. मला माहित नाही काय होत आहे. कारण माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. मला रविवारपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि मला खूप अशक्त वाटत होते. मला तिथून डिस्चार्ज व्हायचे होते, कारण मला तिथे चांगले व्हाइब्स मिळत नव्हते. मी अजूनही ठीक होत आहे.” (bollywood jasleen matharu got discharged from hospital)
जसलीनने असेही सांगितले की, ती स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषत: हॉस्पिटलमधून पोस्ट केलेल्या तिच्या व्हिडिओवर आलेल्या नकारात्मक प्रतिक्रियेनंतर. जसलीन म्हणाली, “व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझे खरे फॉलोव्हर्स माझ्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु त्याच वेळी अनेक मूर्ख लोक असेही आहेत, जे घाणेरड्या कमेंट्स करत आहे. मी पहिल्यांदा असे केले होते. सिद्धार्थ शुक्लासोबत जे घडले, ते पाहून मला खूप धक्का बसला आणि अस्वस्थ झाले होते.
दरम्यान जसलीन माथरू ही ‘बिग बॉस १२’ सीझनमधील सर्वाधिक चर्चित राहणाऱ्या स्पर्धकांपैकी एक होती. तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या अनुप जलोटाशी रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे त्यावेळी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच
-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट
-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे