Saturday, June 29, 2024

कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. दिवंगत अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिक चित्रपटाचा ट्रेलर कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाँच करण्यात आला आहे. तसेच, हा ट्रेलर एकाच दिवशी मुंबई आणि चेन्नईमध्ये लॉन्च करण्यात आला. यावेळी कंगनासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मातेही उपस्थित होते.

चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, तो सर्वत्र धमाल करत आहे. ज्यात पुन्हा एकदा अभिनेत्रीची दमदार स्टाईल पाहायला मिळत आहे. आज (23 मार्च)कंगना आपला 34 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्रीला ही शानदार भेट दिली आहे.

गेल्या रविवारी अभिनेत्रीने चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली होती. यासोबतच चित्रपटाचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले होते. ज्यामध्ये कंगनाच्या दमदार आवाजाची जादू दिसली. ट्रेलरमध्ये कंगना अगदी उत्तमरीत्या दिवंगत अभिनेत्री आणि प्रबळ नेत्या जयललिता यांच्या उत्कटतेचे वर्णन तिच्या शब्दात करत आहे.

‘थलायवी’ हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेत्री आणि नंतर राजकारणी झालेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लवकरच जयललिता यांचा चित्रपटांमध्ये संघर्ष करण्यापासून ते प्रसिद्धीपर्यंत आणि नंतर देशातील सर्वात प्रभावशाली राजकारणी म्हणून अमूल्य छाप सोडण्याचा हा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

नुकत्याच पार पडलेल्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात कंगनाने बाजी मारली आहे. तिला एक नव्हे, तर दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटातील तिच्या उत्तम कार्यामुळे पुरस्कार देण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-पांढऱ्या रंगाच्या चादरमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसली टॉपलेस, फोटो शेअर करत म्हणतेय ‘वो पहला प्यार’

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

हे देखील वाचा