Tuesday, July 9, 2024

‘कांतारा’च्या या दमदार अभिनेत्याचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, जाणून घ्या कारण

‘शी’, ‘द फॅमिली मॅन’ आणि 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप साेडणारा अभिनेता किशोर याचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. अभिनेत्यानं ट्विटर नियमांचे उल्लंघन केल्यानं त्याचे खाते निलंबित करण्यात आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री सई पल्लवीच्या वादग्रस्त विधानाचे किशोरने समर्थन केले होते. त्यानंतर काश्मिरी पंडितांच्या हत्येचा संबंध मुस्लिमांच्या हत्यांशी जोडला गेला हाेता. याशिवाय चित्रपट कलाकारांनी सामाजिक प्रश्नांवर मत व्यक्त करणे हा गुन्हा आहे का, असा पलटवार किशोरने केला हाेता. त्यानंतर त्याचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

किशोर याने 2022 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट कंतारामध्ये वन अधिकारी मुरलीधरची भूमिका केली होती. किशोर सोशल मीडियावर त्याच्या विचार आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. 48 वर्षीय अभिनेता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही खूप सक्रिय आहे.

अभिनेत्याने त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये अदानी ग्रुपने मीडिया संस्थेवर पूर्ण नियंत्रण ठेवल्याबद्दल लिहिले आहे. त्यानंतर 30 डिसेंबर हा दिवस स्वातंत्र्य प्रेस आणि भारतीय लोकशाहीसाठी ब्लॅक डे म्हणून करार केला हाेता. त्याचवेळी, नुकतेच 1 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो एका व्यक्तीबद्दल बोलला ज्याने भगवान कांतारा यांचा अपमान केल.

त्यानंतर अभिनेत्याने त्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिले की, “देव असो की दानव, आपण याकडे केवळ श्रद्धा म्हणून का पाहत नाही. जर तुमचा विश्वास असेल, तर ते अस्तित्वात आहे, जर तुमचा विश्वास नसेल तर ते अस्तित्वात नाही, पण त्या विश्वासांचा अपमान करण्याची गरज नाही, जी आपल्यापैकी अनेकांना अडचणीच्या वेळी धैर्य देते. त्या समाजकंटकांना कायद्याने हाताळू द्या. विश्वासाला वैयक्तिक निवड राहू द्या.” असे त्याचे म्हणणे आहे. (bollywood kantara actor kishore  twitter account suspended details inside )

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुख खानच्या चाहत्यांना मोठा झटका, सिनेमागृहात ‘पठाण’ रिलीज होणारच नाही?
‘या’ अभिनेत्रींच्या नावावर चाहत्यांनी बांधली मंदिरे, यादी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हे देखील वाचा