Saturday, June 29, 2024

अरे व्वा! प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिल शर्माने केले आपल्या मुलाचे नाव जाहीर, वाचा काय ठेवलंय नाव?

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकणारा कॉमेडियन कपिल शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची पत्नी गिन्नी चतरथने गोंडस मुलाला जन्म दिला. याची माहिती कपिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली होती. यानंतर चाहते त्याच्या मुलाचे नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. पण आता नुकतेच त्याने त्याच्या मुलाचे नाव जाहीर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय.

गेल्या रविवारी (28 मार्च) कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या अधिकृत ट्विटरवर, गायिका नीती मोहनला दिलेल्या प्रत्युत्तरात त्याच्या मुलाचे नाव उघड केले. त्याने सांगितले त्याच्या मुलाचे नाव ‘त्रिशान’ ठेवले आहे.

नुकताच कपिल शर्माने त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला आहे. यादरम्यान गायिका नीति मोहनने ट्विटरवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय कपिल शर्मा पाजी. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप प्रेम. आता तरी बेबी बॉयचे नाव सांगा.”

यालाच उत्तर देत कपिल शर्माने ट्विटरवर लिहिले की, “धन्यवाद नीति मोहन. आशा आहे की तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेत आहात. आम्ही आमच्या मुलाचे नाव त्रिशान असे ठेवले आहे.”

कपिल शर्माने 2018 साली गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली होती आणि डिसेंबर 2019 मध्ये त्यांच्या घरी अनायरा या गोंडस मुलीने जन्म घेतला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, कपिल सध्या पालकत्व रजेवर आहे. परंतु तो नवीन एडिशन घेऊन परत येऊ शकेल. तसेच तो नेटफ्लिक्स ओरिजिनलमध्येही काम करत आहे, परंतु याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आता तरी सुधरा…’, म्हणत कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री

-नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश

-‘लाखो दिलों की धडकन!’ रश्मिका मंदानाच्या आयुष्यातील ‘ते’ सत्य, जे कोणालाही माहित नाही; सुंदर हास्यामागे आहेत बऱ्याच वेदना

हे देखील वाचा