महिला दिनाच्या औचित्य साधून करिनाने शेअर केला दुसऱ्या मुलाचा फोटो, पोस्ट लिहीत म्हणतेय…

bollywood kareena kapoor khan shares her new born baby first look on womens day noddv


यावर्षी 21 फेब्रुवारीला करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली. मात्र तिच्या दुसर्‍या मुलाची झलक चाहत्यांना दिसली नव्हती. पण आज राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आपल्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या फोटोत करीनाने तिच्या मुलालाकडेवर घेतलेले दिसत आहे. या फोटोसह करीनाने एक खास संदेशही शेअर केला आहे.

करीनाने महिला दिनानिमित्त तिचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करीनाने लिहिले की, “असे काहीच नाही जे एक स्त्री करू शकत नाही, सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

करीना कपूर जेव्हा पहिल्यांदा आई झाली तेव्हा, पहिला मुलगा तैमूरच्या नावावर जोरदार गदारोळ झाला होता. या नावामुळे सैफीना बरेच ट्रोल झाले होते. यासोबतच तैमूर अनेकदा मीडियासमोर येत राहिला. कदाचित, यामुळेच करीना तिच्या दुसर्‍या मुलाबद्दल खूप सावध राहिली आहे. तिने अद्याप दुसर्‍या मुलाची झलक माध्यमांना दिली नाही. यासह आतापर्यंत सैफीनाने चाहत्यांसमोर त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले नाही.

करीना आई झाल्यापासून, अनेक मित्रमंडळी आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोक तिचे अभिनंदन करताना दिसले. मनीष मल्होत्रा, करण जोहरपासून ते मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटी करीनाच्या घराबाहेर स्पॉट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सैफ-अमृता सिंगची मुलगी सारा अली खानदेखील करीनाच्या दुसर्‍या मुलासाठी भेटवस्तू घेताना दिसली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना लवकरच आमिर खानसमवेत ‘लालसिंग चड्ढा’ मध्ये दिसणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’ हा 1994 मधील ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करण जोहरची फिल्म ‘तख्त’मध्ये देखील करीना दिसणार आहे. याव्यतिरिक्त रणवीर सिंग, अनिल कपूर, विक्की कौशल, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.