‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक चकित करणारी पोस्ट शेअर केली आहे. कीर्तीने या पोस्टद्वारे चाहत्यांना, तिच्या आयुष्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माहिती दिली आहे. कीर्तीने पोस्टद्वारे असे जाहीर केले आहे की, ती तिच्या पती साहिल सेहगलपासून विभक्त होत आहे. कीर्ती आणि साहिलचे लग्न पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच 2016 मध्ये झाले होते.
कीर्तीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या संदेशाच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचे आहे की, मी आणि माझे पती साहिल यांनी विभक्त होण्याचे ठरवले आहे. आम्ही फक्त कागदावर नव्हे, तर आयुष्यात वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.”
याच पोस्टमध्ये कीर्तीने पुढे लिहिले, “कोणाबरोबर राहण्याचा निर्णय घेण्यापेक्षा, वेगळे होण्याचा निर्णय घेणे अधिक कठीण आहे. कारण जेव्हा दोन लोक एकत्र येतात, तेव्हा ते सर्व गोष्टींचा आनंद घेतात, प्रेम करतात आणि काळजीही करतात. मात्र, कोणापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यामुळे मन दुखावते. हे मुळीच सोपे नाही, परंतु जे काही आहे ते बदलले जाऊ शकत नाही. माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांना मी सांगू इच्छिते की, मी ठीक आहे, योग्य स्थितीत आहे. आता यानंतर मी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही. यानंतर नाही आणि यावरही नाही. कीर्ती कुल्हारी.”
कीर्ती आणि साहिलच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले, तर दोघांची भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. एका मुलाखती दरम्यान कीर्तीने सांगितले होते की, शूटच्या वेळी त्यांची भेट झाली आणि त्यांनी एकमेकांचे नंबरही घेतले. पण त्यानंतर 5 वर्षे त्यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही आणि 5 वर्षानंतर दोघे अॅड शूटसाठी पुन्हा भेटले आणि इथूनच त्यांची प्रेमकथा सुरू झाली. साहिल आणि कीर्ती बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत नव्हते. मात्र, काही महिन्यांच्या डेटिंगनंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कीर्ती अलीकडेच परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिवंगत अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे निधन; विमानतळावर होता सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत
-‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’