बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत राहते. ती प्रामुख्याने तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहते. पुन्हा एकदा तिचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा अगदी बोल्ड अवतार दिसत आहे. हे फोटो दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिशा पाटणीचा बोल्ड लुक अगदी पाहण्यासारखा आहे. तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर खूप पसंतही केले जात आहेत. इतकेच नव्हे, तर इंस्टाग्रामवरील चाहते दिशाच्या या फोटोंवर जोरदार कमेंट्स करून, तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.
दिशाने शेअर केलेल्या फोटोंना, इंस्टाग्रामवर अवघ्या काही तासांतच 8 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोंवर काही तासांच्या आत लाईक्सची संख्या पाहून, हे स्पष्टपणे समजते, की सोशल मीडियावर दिशा सोबत चाहते जोडले गेले आहेत. केवळ इंस्टाग्रामबद्दल बोलायचे झाले, तर तिला 4 कोटीहून अधिक चाहते फॉलो करतात.
दिशा पाटणी आपल्या बोल्ड अदांनी आणि फिटनेसने सर्वांची मने जिंकत राहते. दिशाने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये चांगले यश मिळवले आहे. तिने ‘एम एस धोनी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. दिशा अखेरच्या वेळेस ‘बाघी ३’ मध्ये दिसली होती.
सध्या दिशा अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. ती सलमान खानच्या ‘राधे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे कामकाज पूर्ण झाले असून, चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीझ केला जाईल. याव्यतिरिक्त दिशा मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.