Sunday, June 8, 2025
Home अन्य ‘दादा’सोबत जोडले गेले होते अभिनेत्री नगमाचे नाव, सौरव गांगुलीच्या पत्नीने रागाच्या भरात उचलला होता अभिनेत्रीवर हात

‘दादा’सोबत जोडले गेले होते अभिनेत्री नगमाचे नाव, सौरव गांगुलीच्या पत्नीने रागाच्या भरात उचलला होता अभिनेत्रीवर हात

बॉलिवूड आणि क्रिकेटचं फार जुनं नातं आहे. तसं बघायचं झालं तर, नवाब पतौडींच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा विराट कोहलीपर्यंत सुरूच आहे, असं म्हणायला हरकत नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या काळातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींशी लग्न केले आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिकेटपटूबद्दल सांगणार आहोत, ज्याचे नाव त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री नगमा यांच्याशी जोडले गेले होते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने परदेशात भारतीय संघाला लढायला शिकवले. भारतीय संघ आज ज्या उंचीवर आहे, त्यामध्ये गांगुलीचे मोठे योगदान आहे. परंतु जेवढी  चर्चा त्याच्या उत्तम कामगिरीची झाली, तेवढीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याचीही झाली आहे. गांगुलीचे अभिनेत्री नगमासोबतचे प्रेमप्रकरण सन २००० मध्ये जोरात सुरू होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, सन २००३ मध्ये दादा म्हणजेच गांगुलीची कामगिरी खराब झाली होती. असे म्हटले जाते की, दादाच्या खराब कामगिरीचे कारण इतर कोणीही नाही, तर नगमा होती. अशी बातमी होती की, अभिनेत्री नगमाला सौरव गांगुलीशी लग्न करायचे होते.

वृत्तानुसार, गांगुलीची पत्नी डोना रॉय यांना जेव्हा सौरव आणि नगमाच्या अफेअरची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना खूप राग आला होता. डोना एकदा रागावल्या, आणि त्यांनी नगमांवर हात उगारला होता. असे म्हणतात की, क्रिकेटमधील बिघडलेली कामगिरी आणि घरातील वाढते कलह यामुळे दादा आणि नगमा यांच्यात ब्रेकअप झाले होते.

सौरव गांगुलीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान कोणीही विसरू शकणार नाही. आता तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा अध्यक्ष आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

-जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘८ दिवसात लग्न केले नाही तर…’

-जर कॉमेडीचा शहेनशाह सतिश कौशिकचा अस्सल अभिनय पाहायचा असेल तर हे पाच सिनेमे नक्की पाहा

हे देखील वाचा