Monday, July 1, 2024

ओह माय गॉड! ४८ वर्षीय मंदिरा बेदीने केलं बिकिनीमध्ये वर्कआऊट, एकदा नजर टाकाच

मनोरंजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत असते. 48 वर्षीय मंदिरा तिच्या फिटनेसने चांगल्या चांगल्याना टक्कर देत असते. दोन मुलांना जन्म देऊनही तिने तिचे शरीर खूपच टोन आणि फिट ठेवले आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘ओ माय गॉड!’

मंदिरा बेदी सध्या दोन मुलांची आई आहे, परंतु ती तिच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमी सतर्क असते. मंदिरा बेदी कोणत्याही आईसाठी फिटनेस आयकॉनपेक्षा कमी नाही. तिचे शरीर पाहून तुम्हाला असे वाटणार नाही की तिने दोन मुलांना जन्म दिला आहे. ती ही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. ती नियमितपणे तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. अलीकडेच तिने बिकीनीमध्ये एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये मंदिरा बाथटबच्या समोर बिकिनीमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने, “बाथटब, बिकिनी आणि बँगिंग वर्कआउट” असे कॅप्शन दिले आहे.

मंदिरा बेदी तिच्या टोन्ड बॉडीची देखभाल करण्यासाठी कठोर वर्कआउट्स आणि डाएट रूटीन फॉलो करत असते. तिच्या या व्हिडिओवर युजर्स जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ काही काळापूर्वी शेअर करण्यात आला आहे, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमुळे तिचे खूप कौतुकही होत आहे.

अभिनेत्री एका किशोरवयीन मुलाची आई आहे. परंतु तिचे सपाट पोट आणि परिपूर्ण शरीरयष्टी पाहून यावर विश्वास बसनेही कठीण आहे.

प्रसुतीनंतर उत्तम आहार आणि व्यायामाच्या मदतीने मंदिराने तब्बल 22 किलो वजन कमी केले. याच्यावरूनच आपण अंदाज लावू शकता की ती तिच्या आरोग्याकडे किती लक्ष देते. प्रसूतीनंतर मंदिराने बरेच वजन कमी केले आणि तिच्या कंबरेचा आकार 26 इंच इतका आहे.

हे देखील वाचा