Saturday, July 6, 2024

मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांना वाढदिवसानिमित दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली पप्पा ‘तुम्ही चांगलं केलं…’

मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने तिच्या वडिलांचा वाढदिवस या पोस्टने आणखी खास बनवला आहे. वर्षानुवर्षे आपल्यापासून दूर असलो तरी ते हृदयाच्या खूप जवळ आहेत हे तिने पोस्टमधून दाखवून दिले.

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता हिला वेगळ्या परिचयाची गरज नाही. देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या यादीत तिचे नाव आघाडीवर आहे. डिझायनरअ भिनेत्री मसाबाने अलीकडेच ‘मसाबा मसाबा’ नावाची मालिका रिलीज केली. जी आई-मुलीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. ही मालिका जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते. अलीकडेच, ती प्रकाशझोतात आली जेव्हा तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने 27 जानेवारी रोजी अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. मसाबाचे जितके तिच्या आईवर प्रेम आहे, तितकेच तिचे वडील (अनुभवी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स) यांच्यावरही प्रेम आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिने भावनिक पोस्टसह खास फोटो शेअर केले आहेत.

दिग्गज क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स 71 वर्षांचे झाले आहेत. मसाबा ही नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने तिच्या वडिलांचा वाढदिवस या पोस्टने आणखी खास बनवला आहे. वर्षानुवर्षे आपल्यापासून दूर असले तरी वडील तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहोत हे तिच्या शेअर केलेल्या पोस्ट मधून  दिसून येते.
मसाबाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या वडिलांसोबतचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. सत्यदीप मिश्रासोबतच्या तिच्या लग्नाच्या पार्टीतील काही न पाहिलेले फोटो पोस्ट करत तिने भावनिक कॅप्शन लिहिले, ‘हॅपी बर्थडे बाबा. तू चांगले केलेस. आम्ही खूप चांगले केले. मी तुम्हाला ते सर्व दाखवण्यास उत्सुक आहे, जे मी कोणत्याही भीतीशिवाय करेन.’ यासोबत तिने केक आणि फुग्याचे इमोजी शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

 

पहिल्या फोटोमध्ये मसाबा तिच्या वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. तर, दुसऱ्या चित्रात मसाबा आणि सत्यदीप दोघेही व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत दिसत आहेत. मसाबाच्या या पोस्टवर यूजर्स चांगलीच कमेंट करत आहेत. तसेच मसाबा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिच्या छायाचित्रांमुळे ती खूप चर्चेत असते. मसाबाचा ‘मसाबा’ हा ब्रँड जगभरात ओळखला जातो. (bollywood-model-fashion-designer-masaba-gupta-share-social-media-post-for-her-father-veteran-cricketer-vivian-richards-71-birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्रीला पत्र लिहित चाहता म्हाणाला, ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या….,’
धक्कादायक! अभिनेत्रीला प्रियकराकडून बेदम मारहाण, ओळखणे झाले कठीण; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

हे देखील वाचा