Wednesday, July 3, 2024

सम्राट पृथ्वीराज | ‘या’ देशांमध्ये बॅन करण्यात आलाय अक्षय कुमारचा चित्रपट, पण का?

अक्षय कुमार (Akshay Kumar), मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सोनू सूद (Sonu Sood) स्टारर ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अक्षय कुमारने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडलेली नाहीये. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काही दिवसांपुर्वी करणी सेनेमुळे चित्रपटाचे नाव बदलण्यात आले होते. तर आता हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’वर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

कुवेत आणि ओमानमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’वर बंदी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सम्राट पृथ्वीराज’वर कुवेत आणि ओमानमध्ये बंदी घालण्यात आली असून, तिथे हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ही पीरियड फिल्म असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या चित्रपटावर बंदी घातल्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याच वेळी, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात आहे की, या चित्रपटात हिंदू राजाची ताकद दाखवली आहे, ज्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचवेळी केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चित्रपटात इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे, त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. (bollywood movie samrat prithviraj banned in oman and kuwait)

‘पृथ्वीराज’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय आणि मानुषीशिवाय या चित्रपटात सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर, ललित तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा