Monday, July 1, 2024

‘द केरला स्टाेरी’वरून पुण्यातील FTIIमध्ये राडा, माेठ्या पाेलीस फौजफाट्यासह चित्रपटाचं स्क्रीनिंग

फिल्म अॅन्ड टेलीविज़न इंस्टिट्यूट ऑफ़ इंडिया (एफटीआयआय)मध्ये  शनिवारी (दि. 20 मे)ला ‘द केरला स्टोरी’चे नीती या संस्थेच्या माध्यमातून स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने चित्रपटाला विरोध दर्शवला. अशात सकाळी 9.00 वाजता चित्रपट सुरु हाेताना दाेन्ही गटांकडून घाेषणाबाजी करण्यात आली.

महत्वाची बाब म्हणजे ‘द केरला स्टाेरी’ (the kerala story) या चित्रपटाने निर्माते विपुल शाह (vipul shah) आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन (sudipto sen) देखील या शोसाठी उपस्थित होते. अशात विद्यार्थ्यांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि हा शाे पार पडला.

‘द केरला स्टाेरी’ या चित्रपटावरून वाद सुरु असला तरी हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 150 कोटीचा टप्पा पार केला आहे. अशातच हा चित्रपट लवकरच 200 कोटी क्लबमध्ये जाईल असं मत चित्रपट समीक्षक व्यक्त करत आहेत.(bollywood movie the kerala story show in ftii protest in ftii against the screening of the kerala story )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मागील पानावरून पुढे! मराठीमधील ‘या’ लोकप्रिय कलाकारांच्या त्रिकुटाची तब्बल ४ दशकांनी एकत्र भेट, व्हिडिओ झाला व्हायरल

दुःखद! ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचे निधन वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा