Wednesday, July 3, 2024

खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट, जे बघतांना तुम्हालाही फुटेल घाम

बॉलिवूडमध्ये खऱ्या घटनांवर अनेक सिनेमे बनले आहेत. देशात अशा अनेक हत्या झाल्या आहेत, ज्यांनी प्रत्येक माणूस हादरला आहे. अशा परिस्थितीत या कथांवर बनलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. चला जाणून घेऊया अशा बॉलिवूड चित्रपटांबद्दल जे खऱ्या हत्यांचा रहस्यांवर आधारित आहेत.

तलवार
2015 मध्ये मेघना गुलजारच्या ‘तलवार’ चित्रपटात आरुषी तलवार हत्याकांडाचे रहस्य दाखवण्यात आले होते. हा चित्रपट 2008 मध्ये आरुषी तलवार आणि तिचा नोएडा येथील घरकामगार हेमराज यांच्या हत्येवर आधारित आहे. हत्येच्या दोन बाजू चित्रपटात दाखवल्या आहेत. मात्र आजही ही हत्या लोकांसाठी एक गूढच आहे.

नो वन किल्ड जेसिका
राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात दिल्लीतील जेसिकाच्या हत्येचे चित्रण करण्यात आले आहे. जेसिकाचा मारेकरी माजी मंत्र्याचा मुलगा होता. जेसिकावर गोळी झाडण्यात आली त्यावेळी तेथे 300हून अधिक लोक उपस्थित होते. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि विद्या बालन यांनी दमदार अभिनय केला आहे.

द अटैक ऑफ 26/11
सर्वात धक्कादायक दहशतवादी हल्ला ज्याने देशाला आश्चर्यचकित केले तो म्हणजे 2611. मुंबईत त्या रात्री एकामागून एक झालेला गोळीबार, नियोजन, अंमलबजावणी हे खरोखरच अविस्मरणीय आहे. आरजीव्ही दिग्दर्शित हा चित्रपट खरच एपीक चित्रपट आहे. नाना पाटेकर यांचा समावेश असलेला हा चित्रपट नक्कीच पाहावा असा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच
हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक

हे देखील वाचा