बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेकदा पुरुष आणि महिला कलाकारांच्या फीसंदर्भात अनेक समस्या असतात. बऱ्याच महिला कलाकारांनी याबद्दल आवाज उठवला आहे, परंतु आजपर्यंत यावर कोणताही उपाय सापडलेला नाही. आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि त्यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी २०१८ मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटाद्वारे चित्रपटात पुनरागमन केले आहे. यानंतर त्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसल्या.
नीता गुप्ता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फी असमानतेवर म्हणाल्या, “फी समानतेचा हा प्रश्न मला आवडतो. मला तुम्हीच सांगा, कोणत्या व्यवसायात महिलांना पुरुषांइतकीच फी दिली जाते. एक गृहिणी किती काम करते ते पाहा. तिला कधी मोबदला मिळतो का? नाही? तिला घर चालवण्यासाठी पैसे मिळतात, पण स्वतःसाठी काहीतरी विकत घेण्यासाठी तिला तिच्या पतीची परवानगी घ्यावी लागते.” (bollywood neena gupta reacts on fee difference between male and female actors)
नीता गुप्ता मानतात की, अनेक समाजात महिलांना दुसरा दर्जा दिला जातो. त्या म्हणाल्या, “तुम्हाला ते आवडेल किंवा नाही, पण हे पुरुषांचे जग आहे. मग ते घर असो किंवा ऑफिस, पुरुष नेहमी काम करतो. स्त्री पुरुषापेक्षा खूप जास्त काम करते. तुम्ही असे म्हणू शकता की, त्या पुरुषांच्या कामात किती ताण आहे. पण स्त्रियांचे काम कधीच संपत नाही. मग ते घर स्वच्छ करणे, स्वयंपाक करणे किंवा घरभाडे देणे असो. या सर्वांसाठी कोणी त्यांचे आभार देखील मानत नाही.”
पुढे त्या म्हणतात की, “या वेतन समानतेच्या चर्चेला काही अर्थ नाही. प्रथम हे पुरुष आहेत, मग महिला. नेहमीच असे होते. मी त्यात खूश आहे. प्रथम असणे म्हणजे अनेक जबाबदाऱ्या. मला माहित आहे की, मी कशासाठी पात्र आहे. पण मी याचा विचार करत नाही. मी पुढे गेली आहे.” तसेच नीना गुप्ता यांना वाटते की, आपण पुरुष आणि महिलांमध्ये वेतन समानतेची अपेक्षा करणेही थांबवले पाहिजे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ
-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर
-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर