बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर करत, त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज वसंत पंचमीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या मुलाने म्हणजेच अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) जन्म घेतला होता. शनिवारी (५ फेब्रुवारी) अभिषेक त्याचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे.
बिग बी यांच्यासाठी वसंत पंचमीचा दिवस आनंदानी भरलेला आहे. सर्वत्र फुले बहरली आहेत, तसेच सर्वजण विद्येची देवता सरस्वतीला अभिवादन करण्यात व्यस्थ आहेत. अशा परिस्थितीत अमिताभ यांनीही वाग्देवची पूजा करून आपल्या मुलाला भरपूर शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला आहे.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी, म्हणजेच ५ फेब्रुवारीला विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या महिन्यातला हा सण ‘वसंत पंचमी’ म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, विद्येची आणि कलेची देवी मातेच्या वंदनात वसंत ऋतू संपूर्ण धरणी व्यापून टाकते. संपूर्ण वातावरणात एक वेगळा असा सुगंध दरवळला जातो. आज या दिग्गज अभिनेत्याच्या म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे. बिग बी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहीले की, “वसंत पंचमीच्या अनेक शुभेच्छा आणि आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्याला हार्दिक शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद, खुप प्रेम.”
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी मुलगा अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्यामुळे, अमिताभ बच्चन यांच्या कोणत्याही पोस्टला तासाभरात हजारो लाईक्स मिळतात.
हेही वाचा :