Saturday, June 29, 2024

‘सिर्फ तुम’ चित्रपटातील आरती आठवते का? आज अशी दिसते अभिनेत्री प्रिया गिल

अभिनेता संजय कपूर, अभिनेत्री सुश्मिता सेन आणि प्रिया गिल यांचा ‘सिर्फ तुम’ हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची प्रेमकहाणी अशी दाखविण्यात आली जिथे कोणीही एकमेकांना पाहिलं नाही, मात्र प्रेम देखील इतके होते की, ते मिळवण्यासाठी सर्व प्रेम केले गेले. या चित्रपटात दीपक म्हणजे संजय कपूर आणि आरती म्हणजेच प्रिया गिल यांच्यातल्या प्रेमाने चित्रपटगृहामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोन्ही कलाकारांनी आपल्या चाहत्यांच्या मनात जागा केली. त्याचवेळी, चित्रपट प्रदर्शित होऊन २२ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि चित्रपटातील अभिनेत्री प्रिया गिल हिचा लूक देखील बदलला आहे.

सोशल मीडियावर प्रिया गिलचा (priya gill) नवीन फोटो व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो तिच्या खास मैत्रिणीने काढला आहे. एकदम सध्या आणि बिना मेकपमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे. आरतीचा म्हणजे प्रिया गिलचा हा फोटो पाहून तिचे चाहते कौतुक करताना थकत नाहीत. तिच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये असं लिहिलं की, “तू फार छान दिसतेस.” तर दुसऱ्या चाहत्यांनी कमेंट करत लिहिलं की, “तू अजिबात नाही बदली.”

तुम्हाला माहित आहे का प्रिया गिल १९९५ मध्ये मिस इंडिया फायनलिस्ट आहे. तिने सलमान खान, शाहरुख खान या सारख्या दिग्ग्ज कलाकारासोबत काम केलं आहे. मात्र तिची चित्रपटाची कारकिर्दी काही खास नव्हती. प्रिया गिलने बॉलिवूड व्यतिरिक्त भोजपुरी, मल्याळम या सारख्या चित्रपटात काम केलं आहे. प्रिया शेवटची २००६ साली आलेल्या ‘भारवी’ या चित्रपटात दिसली.

हेही वाचा :

हे देखील वाचा