बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, काही महिन्यांपासून कपूर घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळताना दिसत आहे. एक एक कलाकार या घराण्यातून जगाला निरोप देताना दिसत आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाला कायमचा निरोप दिला. त्यांचे भाऊ राजीव कपूर यांचेही ९ फेब्रुवारी, २०२१रोजी निधन झाले. या दोन भावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराण्यासह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. कपूर घराण्याच्या या पिढीचे रणधीर कपूर आणि रीमा जैन हयात आहेत. राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
असे म्हटले जाते की, राजीव कपूर यांचे पत्नीशी वाद झाल्यामुळे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर ते दोघे सार्वजनिक ठिकाणी कधीही एकत्र दिसले नव्हते. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, या दोघांचाच राजीव कपूर यांच्या मालमत्तेवर हक्क आहे. त्यासाठी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयात या दोघांनाही राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा पुरावा आणण्यास सांगितले आहे.
रणधीर आणि रीमा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सुनावणी केली. राजीव कपूर यांचे २००१ मध्ये आरती सबरवाल यांच्यासोबत लग्न झाले होते, आणि २००३ मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. सुनावणीत रणधीर आणि रीमा यांचे वकील म्हणाले आहेत की, त्यांच्याकडे राजीव आणि आरती यांच्या घटस्फोटाचे कोणतेही कागतपत्रे नाहीत. राजीव कपूर यांच्या मालमत्तेवर फक्त भाऊ- बहीण यांचाच हक्क आहे.
रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले, आमच्याकडे त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नाहीत. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते सापडले नाही आहेत. त्यांना घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यास सूट देण्यात यावी. त्यावर न्यायाधीश गौतम पटेल म्हणाले आहेत की, या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढे काय निकाल लागतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे .
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-