Monday, July 1, 2024

महिलेकडे स्तनपान करतानाचा व्हिडिओ मागणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री नेहा धुपियाची चपराक; फोटो शेअर करत दिले सडेतोड प्रत्युत्तर

नेहा धुपिया बॉलिवूडमधील रोखठोक वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती अनेक विषयांवर बोलताना दिसते. यावेळी, तिने महिलेला स्तनपान करत असतानाचा व्हिडिओ मागणाऱ्या एका व्यक्तीला चपराक दिली आहे.

खरं तर एका युजरने एका महिलेला स्तनपान करत असतानाचा व्हिडिओ मागितला होता. नेहाला ही गोष्ट आवडली नाही. तिने मुलगी मेहरला स्तनपान करत असतानाचा फोटो शेअर करत त्या ट्रोलरला तिने चांगलेच उत्तर दिले आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी सहसा अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करते किंवा त्यांच्या कमेंट्स सरळ काढून टाकत असते. पण मला ही गोष्ट चर्चेत आणण्याची गरज आहे. अशा मानसिकतेचे लोक स्तनपान करण्याच्या मुलभूत गरजेला लाजीरवाणा अर्थ देतात.’

नेहाने फोटोंसह स्तनपान देण्याबाबत सविस्तर सांगितले आहे. ती म्हणाली, ‘नवीन आईचा प्रवास आहे, त्या प्रवासाला केवळ तिच समजू शकते. जेथे, एका बाजूला हे आनंदी क्षण असतात, त्यासोबतच ते एक जबाबदारीचे कार्य देखील असते. आई होणे खूप कठीण आहे. या कालावधीत जे केले पाहिजे ते सर्व करणे गरजेचे आहे. यामधील शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ट्रोलवर प्रश्न विचारणे आवश्यक आहे. त्यांना समजावणे गरजेचे आहे. मीसुद्धा या परिस्थितीतून गेले आहे, आणि मला ते समजू शकते. हे केवळ तिच्या आईवर अवलंबून असते की, बाळाला कुठे दुध पाजले पाहिजे. पण आजही बर्‍याच वेळा पाहिले आहे की, स्तनपान करणाऱ्या आईला वाईट नजरेने बघितले जाते.’

नेहा पुढे म्हणाली, ‘मी आई झाल्यापासून, मी माझ्या आजूबाजूच्या भागात समाजात स्तनपान अधिक सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला आहे. या क्रियेबद्दल अत्यंत संवेदनशील असण्याची गरज आहे. असे असंवेदनशील आणि अश्लील कमेंट देशभरातील मातांना लाजिरवाणे करत असते.’

नेहाने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘जुली’, ‘चुप चुप के’, ‘सिंग इज किंग’, ‘शीशा’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ती ‘एमटीव्ही रोडीज’ मध्येही दिसते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्विटरनंतर आता कंगनाने साधला इंस्टाग्रामवर निशाणा, म्हणाली ‘२०२४ निवडणुकीत भाजपला धोका’

-काळजाला चटका लावणारी बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली माहिती

-‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट

हे देखील वाचा